नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी उमेदवारांची दहावी यादी जाहीर केली. यामध्ये चंदिगड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमधील नऊ मतदारसंघाचा समावेश आहे. चंदिगडमधून संजय टंडन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तसेच पश्चिम बंगालच्या आसनसोल मतदारसंघातून एस.एस.अहलुवालिया यांना उमेदवारी देण्यात आली. तर उत्तर प्रदेशच्या मैनपुरी येथून जयवीर सिंह ठाकूर, कौशांबी-विनोद सोनकर, फुलपूर-प्रवीण पटेल, अलाहाबाद-नीरज त्रिपाठी, बलिया-नीरज शेखर, मछलीशहर-बी.पी.सरोज, गाजीपूर-पारस नाथ राय यांना संधी देण्यात आली आहे.