अयोध्येत रामभक्तांसाठी भाजपचा लंगर

अयोध्येत सामुदायिक स्वयंपाकघर सुरू करण्याची तयारी काही दिवसांपूर्वी सुरू झाली होती.
अयोध्येत रामभक्तांसाठी भाजपचा लंगर

उना :  हिमाचल प्रदेश भाजपच्या वतीने राम मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांसाठी येत्या २६ जानेवारी ते २६ मार्चपर्यंत अयोध्येत 'लंगर' (सामुदायिक स्वयंपाकघर) आयोजित करीत असल्याचे भाजप प्रवक्त्याने गुरुवारी सांगितले.  

अयोध्येत सामुदायिक स्वयंपाकघर सुरू करण्याची तयारी काही दिवसांपूर्वी सुरू झाली होती. लंगर उभारण्यासाठी परवानगी मिळाल्यानंतर लोकांच्या सहकार्याने गोळा केलेला १८ टन रेशनचा ट्रक उनाच्या गाग्रेट येथून बुधवारी संध्याकाळी अयोध्येकडे रवाना करण्यात आला, तर लोकांच्या सहकार्याने रेशनने भरलेला दुसरा ट्रक पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

 हिमाचल भाजपचे सचिव आणि गाग्रेटचे माजी आमदार राजेश ठाकूर लंगर व्यवस्थेची जबाबदारी सांभाळत आहेत, असे त्या प्रवक्त्याने सांगितले. येथे हिमाचल प्रदेशातील लोक अन्न शिजवून लोकांना देणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in