राज्यसभेच्या ५६ पैकी ३० जागा भाजपला, बहुमतापासून ४ जागा दूर

राज्यसभेतील ५६ रिक्त जागांसाठी मंगळवारी झालेल्या मतदानाचे निकाल हाती आले असून त्यानुसार ३० जागांवर भारतीय जनता पक्षाचा विजय झाला आहे. त्यामुळे...
राज्यसभेच्या ५६ पैकी ३० जागा भाजपला, बहुमतापासून ४ जागा दूर
(संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली : राज्यसभेतील ५६ रिक्त जागांसाठी मंगळवारी झालेल्या मतदानाचे निकाल हाती आले असून त्यानुसार ३० जागांवर भारतीय जनता पक्षाचा विजय झाला आहे. त्यामुळे भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील बहुमतापासून केवळ ४ जागा दूर राहिली आहे.

राज्यसभेच्या एकूण २४० जागांपैकी ५६ जागा यंदा रिक्त झाल्या होत्या. त्यासाठी मंगळवारी (२७ फेब्रुवारी) मतदान पार पडले. त्याचा निकाल हाती आला असून त्यात ५६ पैकी ३० जागा भाजपने जिंकल्या आहेत. भाजपने जिंकलेल्या ३० जागांपैकी २० जागांवरील उमेदवारांची बिनविरोध निवड झाली होती आणि १० जागांवर भाजपच्या उमेदवारांचा मतदानानंतर विजय झाला आहे. त्यामुळे आता राज्यसभेत केवळ भाजपचे ९७ सदस्य झाले आहेत. तर भाजपप्रणीत एनडीएचे ११७ सदस्य झाले आहेत. राज्यसभेत बहुमत असण्यासाठी २४० पैकी १२१ जागा मिळणे आवश्यक आहे. आता एनडीए त्या आकड्यापासून केवळ ४ जागा दूर राहिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in