किरण खेर यांचा पत्ता कट; चंदिगडमधून संजय टंडन यांना भाजपची उमेदवारी

आपल्यासाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे, पक्षाने उमेदवारी देऊन एक संधी दिली आहे, त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानतो, असे टंडन यांनी म्हटले आहे.
किरण खेर यांचा पत्ता कट; चंदिगडमधून संजय टंडन यांना भाजपची उमेदवारी

चंदिगड : चंदिडमधील लोकसभेच्या एकमेव जागेसाठी भाजपने विद्यमान खासदार किरण खेर यांचा पत्ता कापून त्यांच्याऐवजी संजय टंडन यांना उमेदवारी जाहीर केली आहे. टंडन हे भाजपचे हिमाचल प्रदेशचे सहप्रभारी आहेत.

आपल्यासाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे, पक्षाने उमेदवारी देऊन एक संधी दिली आहे, त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानतो, असे टंडन यांनी म्हटले आहे.

जवळपास गेल्या ४० वर्षांपासून आपण चंदिगडशी या ना त्या कारणाने जोडलेले आहोत, चंदिगडमधील जनता आपले कुटुंब आहे. त्यांच्या कल्याणात आपण कोणतीही कसर ठेवणार नाही, असे टंडन यांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in