राहुल गांधीचे 'ते' विधान आणि भाजप नेत्याने केली पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घर देण्याची मागणी

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी एक विधान केले होते, त्यानंतर आता भाजप नेत्याने त्यांना घर देण्यासाठी प्रशासनाकडे मागणी केली
राहुल गांधीचे 'ते' विधान आणि भाजप नेत्याने केली पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घर देण्याची मागणी

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी रायपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात, "माझे वय ५२ असून माझ्याकडे राहण्यासाठी अजूनही घर नाही," असे विधान केले होते. यावरून छत्तीसगडचे बेमेतरा येथील भाजप नेते देवदास चतुर्वेदी यांनी प्रशासनाला पात्र लिहीत, "राहुल गांधींना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घर देण्यात यावे" अशी मागणी केली आहे.

भाजप नेते देवदास चतुर्वेदी यांनी पत्रामध्ये लिहिले आहे की, "राहुल गांधींना सरकारी जमीन देण्यात यावी. असे केल्याने राहुल गांधींसारख्या गरिबांनाही पक्के घर मिळेल आणि त्यांचे घराचे स्वप्नही पूर्ण होईल. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्वाकांक्षी पंतप्रधान आवास योजनादेखील पूर्ण होईल." या पत्राची प्रत सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली.

logo
marathi.freepressjournal.in