दिल्लीचा मुख्यमंत्री आज ठरणार; १८ फेब्रुवारीला शपथविधी?

भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक सोमवारी होणार आहे. यात दिल्लीच्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा केली जाणार आहे, अशी माहिती दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी दिली.
दिल्लीचा मुख्यमंत्री आज ठरणार; १८ फेब्रुवारीला शपथविधी?
Published on

नवी दिल्ली : भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक सोमवारी होणार आहे. यात दिल्लीच्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा केली जाणार आहे, अशी माहिती दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी दिली.

या बैठकीसाठी निरीक्षकांचे नाव आज सकाळपर्यंत ठरेल. या बैठकीला दिल्लीचे सातही खासदार उपस्थित राहतील, तर नवीन सरकारचा शपथविधी १८ फेब्रुवारीला रामलीला मैदानात होऊ शकतो. हा शपथग्रहण सोहळा भव्य प्रमाणात आयोजित केला जाणार असून एक लाख जण उपस्थित राहू शकतात.

दिल्लीत बऱ्याच काळानंतर भाजपला विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्याने शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी भाजपने सुरू केली असून हा कार्यक्रम भव्यदिव्य स्वरुपात करण्यात येणार आहे.

१८ फेब्रुवारीला शपथविधी?

१८ फेब्रुवारीला दिल्लीच्या नव्या सरकारचा शपथविधी कार्यक्रम होण्याची शक्यता असून या सोहळ्याला पंतप्रधान मोदी यांच्यासोबत केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री, भाजप व रालोआ आघाडीचे २१ राज्यांतील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील, असे सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in