आम्हाला आमदार निधीतून १० टक्के कमिशन मिळते! उत्तर प्रदेशातील भाजप आमदाराच्या दाव्याने खळबळ

आम्हाला आमदार निधीतून १० टक्के कमिशन मिळते. पण कार्यकर्त्यांना काहीच फायदा होत नाही, असा दावा उत्तर प्रदेशातील भाजप आमदार महेश त्रिवेदी यांनी केला. त्यांच्या या दाव्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
आम्हाला आमदार निधीतून  १० टक्के कमिशन मिळते! उत्तर प्रदेशातील भाजप आमदाराच्या दाव्याने खळबळ
Published on

कानपूर : आम्हाला आमदार निधीतून १० टक्के कमिशन मिळते. पण कार्यकर्त्यांना काहीच फायदा होत नाही, असा दावा उत्तर प्रदेशातील भाजप आमदार महेश त्रिवेदी यांनी केला. त्यांच्या या दाव्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

सोशल मीडियावर कानपूरच्या किदवई नगर येथील भाजप आमदार महेश त्रिवेदी यांचा एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. एका कार्यक्रमात आमदार त्रिवेदी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसमोरच हे खळबळजनक विधान केले.

आमदार त्रिवेदी म्हणाले, “जर तुम्हाला काही मिळत नसेल, तर निदान पुण्य कमवा आणि वर जा, यात काय हरकत आहे?”

हिंदूंची तुलना केली प्राण्यांशी

महेश त्रिवेदी फक्त कमिशनच्या कबुलीवरच थांबले नाहीत, तर आणखी एक वादग्रस्त विधान त्यांनी केले. त्यांनी हिंदूंची तुलना प्राण्यांशी करत म्हटले की, आपल्या सुरक्षेसाठी हिंदूंनी घरात तलवार ठेवली पाहिजे. एवढेच नव्हे तर ते म्हणाले, हिंदूपेक्षा प्राणी चांगला, कारण तो किमान आपल्या बचावासाठी शिंग तरी उगारतो, पण हिंदू तेही करत नाही, असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in