तेलंगणमधील भाजप आमदाराला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

टी. राजा सिंह यांचा स्टॅण्डअप कॉमेडियन मुन्नवर फारुकीसंदर्भात बोलतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे
तेलंगणमधील भाजप आमदाराला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर तेलंगणमधील भाजप आमदार टी. राजा सिंह यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ हैदराबाद शहरात नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच भाजपनेही त्यांना पक्षातून निलंबित केले आहे.

टी. राजा सिंह यांचा स्टॅण्डअप कॉमेडियन मुन्नवर फारुकीसंदर्भात बोलतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. दरम्यान, हैदराबादसह देशभरातून संताप व्यक्त होत असतानाच सिंह यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी केली जात होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दोन गटांत द्वेषभाव निर्माण करणे, धार्मिक भावना भडकावण्याचा प्रयत्न करणे, अशा भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांतर्गत टी. राजा सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टी. राजा सिंह यांच्या विधानानंतर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपवर टीका केली आहे. “हैदराबादमधील शांतता भाजपला पाहवत नाहीये. भाजपला सामाजिक सलोखा टिकू द्यायचा नाही. मुस्लिमांना भावनिक तसेच मानसिकदृष्ट्या त्रास द्यायचा, हे भाजपचे अधिकृत धोरणा आहे. प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा सध्या तुरुंगात आहेत का? त्यांना भाजपने पोलीस संरक्षण दिले आहे. भाजप आमदाराने केलेल्या वक्तव्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी सहमत आहेत का?” असा सवाल ओवैसी यांनी केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in