भाजप आमदाराच्या मुलाला लाच स्वीकारताना अटक; घरात सापडले इतके कोटी

कर्नाटकमध्ये भाजप आमदारच्या पुत्राला लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने खळबळ, कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मोठी कारवाई
भाजप आमदाराच्या मुलाला लाच स्वीकारताना अटक; घरात सापडले इतके कोटी

अवघ्या काही महिन्यांमध्ये कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत. अशा स्थितीमध्ये भाजप आमदार मोठ्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण, कर्नाटकमधील चन्नागिरीचे भाजपा आमदार के मडल विरुपक्षप्पा यांचा मुलगा व्ही प्रशांत मडल यांना लोकायुक्त पोलिसांनी तब्बल ४० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पडकले. आमदारांच्या कार्यालयातच हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, आमदार के मडल विरुपक्षप्पा यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

लोकायुक्त पोलिसांनी आमदार विरूपक्षप्पा यांच्या कार्यालयात धाड टाकली आणि प्रशांत यांना लाच घेताना पकडले. यानंतर त्यांना अटक करण्यात आली. तसेच, यानंतर प्रशांत यांच्या घरी टाकलेल्या छाप्यामध्ये तब्बल ६ कोटींचे पैसे आणि संपत्ती सापडली असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता आमदार विरूपक्षप्पा यांच्यासमोरील अडचणी वाढणार आहेत. संबंधित लाच देणाऱ्या व्यक्तीकडे त्यांनी ८० लाखांची मागणी केली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, त्या व्यक्तीने प्रशांत यांच्या विरोधात तक्रार केली होती. त्यानंतर टाकलेल्या धाडीमध्ये आमदारांच्या कार्यालयात १ लाख २० कोटी रुपये रोख ताब्यात घेतले. त्यानंतर प्रशांत यांच्या घरीही पोलिसांनी छापा टाकून तब्बल ६ कोटी रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम जप्त केली.

logo
marathi.freepressjournal.in