राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या हालचाली सुरू

सर्वांना मान्य होईल असा उमेदवार देण्याबाबत राजनाथ यांनी विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांसोबत चर्चा सुरू केली
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या  हालचाली सुरू

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी तगडा उमेदवार देण्यासाठी एकीकडे विरोधी पक्षांकडून बैठकींचे सत्र सुरू झालेले असतानाच सत्ताधारी भाजपनेही आता हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते राजनाथ सिंह हे सध्या सर्वानुमते योग्य उमेदवार देण्यासंदर्भात चाचपणी करत आहेत. सर्वांना मान्य होईल असा उमेदवार देण्याबाबत राजनाथ यांनी विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांसोबत चर्चा सुरू केली आहे.

राजनाथ यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्षा मायावती, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्याशी संवाद साधल्याची माहिती सुत्रांनी दिली. भाजपकडून उमेदवाराची निवड आणि पूर्वनियोजनाची जबाबदारी राजनाथ सिंह यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. विरोधी पक्षांसोबत चर्चा करुन सर्वांचा पाठिंबा असणारा उमेदवार देता येईल का यासंदर्भात सध्या विरोधी पक्षांसोबत चर्चा सुरू आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in