भाजपच्या मतांचा टक्का घसरला; काँग्रेस, सपाची टक्केवारी वाढली

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला जितकी मते मिळाली होती. त्यापेक्षा कमी मते भाजपला यंदाच्या निवडणुकीत मिळाली आहेत. भाजपच्या मतांच्या टक्केवारीत यावेळी घट झाली तर काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा जास्त मते मिळाली.
भाजपच्या मतांचा टक्का घसरला; काँग्रेस, सपाची टक्केवारी वाढली

नवी दिल्ली : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला जितकी मते मिळाली होती. त्यापेक्षा कमी मते भाजपला यंदाच्या निवडणुकीत मिळाली आहेत. भाजपच्या मतांच्या टक्केवारीत यावेळी घट झाली तर काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा जास्त मते मिळाली.

२०१९ च्या तुलनेत यंदा जास्त जागा लढवणाऱ्या पण २७२ च्या जादुई आकड्यापासून दूर राहिलेल्या भाजपने मतदानाच्या ३६.५८ टक्के मते मिळवली. भाजपच्या मतात ०.७२ टक्क्यांची घसरण झाली.

काँग्रेसच्या मतांची टक्केवारी १.७६ टक्क्यांनी वाढून २१.२ टक्क्यांवर पोहोचली. २०१९ मध्ये काँग्रेसला १९.४६ टक्के मते मिळाली होती.

काँग्रेसने राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या उत्तर भारतातील राज्यांमध्ये आपली कामगिरी सुधारली आहे. तर अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षाने २०१९ मध्ये २.५५ टक्के मते मिळवली होती. २०२४ च्या निवडणुकीत त्यांना ४.५९ टक्के मते मिळाली. तर जदयूला २०१९ मध्ये १.४५ टक्के मिळाली होती. आता त्यांना १.२५ टक्के मते मिळाली. पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला २०१९ च्या निवडणुकीत ४.०६ टक्के मिळाली होती. आता त्यांना ४.३८ टक्के मते मिळाली.

logo
marathi.freepressjournal.in