लोकसभेआधी मोर्चेबांधणी: 'इनकमिंग'साठी भाजपची विशेष समिती, नाराजांना राजी करणार

लोकसभा निवडणूक जवळ आली असताना एका बाजूला विरोधकांची इंडिया आघाडी सक्रिय झाली आहे, तर दुसऱ्या बाजूला सत्ताधारी भाजपने देखील देशपातळीवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
लोकसभेआधी मोर्चेबांधणी: 'इनकमिंग'साठी भाजपची विशेष समिती, नाराजांना राजी करणार

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक जवळ आली असताना एका बाजूला विरोधकांची इंडिया आघाडी सक्रिय झाली आहे, तर दुसऱ्या बाजूला सत्ताधारी भाजपने देखील देशपातळीवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी नवी दिल्लीत भाजपची उच्चस्तरीय बैठक झाली, ज्यात देशभरातील नाराज नेत्यांचे भाजपमध्ये इनकमिंग सुलभ करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला.

भाजपची ही विशेष समिती देशातील अन्य पक्षांतील नाराज नेत्यांसोबत संपर्क करण्याचे काम करणार आहे. त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचेही ही समिती काम करणार आहे. या समितीला अधिकारही दिले जाणार आहेत. या समितीची मान्यता मिळाल्यानंतरच कोणत्याही नेत्याचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश शक्य होणार आहे. पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. याशिवाय राज्यांतील पक्षाचे पदाधिकारीही सहभागी झाले आहेत. तसेच २२ जानेवारीला अभिषेक सोहळ्यासंदर्भात भाजपची दुसरी बैठक अयोध्येत होत आहे. यामध्ये कार्यक्रमाची रणनीती निश्चित केली जाणार आहे. या बैठकीत प्रभू रामाच्या अभिषेक सोहळ्याची माहिती देशभरातील लोकांपर्यंत कशी पोहोचवायची याचा निर्णय घेतला जाईल. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा भाजपला जास्त फायदा निवडणुकीत होईल, असे बोलले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in