सोनियांविरुध्द भाजपचे काहूर; ’वंदे मातरम्‘चा अपमान केल्याचा आरोप, काँग्रेसने माफी मागावी - शहांची मागणी

‘वंदे मातरम्’ च्या कथित अपमानावरून भाजपने काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधींविरुद्ध मोठे काहूर उभे केले आहे.
सोनियांविरुध्द भाजपचे काहूर; ’वंदे मातरम्‘चा अपमान केल्याचा आरोप, काँग्रेसने माफी मागावी- शहांची मागणी
सोनियांविरुध्द भाजपचे काहूर; ’वंदे मातरम्‘चा अपमान केल्याचा आरोप, काँग्रेसने माफी मागावी- शहांची मागणीसंग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्लीः ‘वंदे मातरम्’ च्या कथित अपमानावरून भाजपने काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधींविरुद्ध मोठे काहूर उभे केले आहे. या प्रकरणी काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. काँग्रेसने ती फेटाळून लावली आहे.

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’चा अपमान केला असून अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी केली.

काँग्रेस मुख्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमादरम्यान पक्षनेत्या सोनिया गांधी यांनी ‘वंदे मातरम्’ हे गीत अर्धवट थांबवण्यास सांगितले, असा आरोप अमित शहा यांनी केला. चित्तोडगड येथे एका जाहीर सभेत ते बोलत होते. काँग्रेसला जर काही लाज उरली असेल तर हात जोडून बंकिम बाबूंच्या अमर आत्म्याची आणि जनतेची माफी मागावी,’’ असे आवाहन त्यांनी केले. मतपेढीच्या राजकारणामुळे काँग्रेस 'वंदे मातरम्' विसरली आहे, असा आरोप गृहमंत्र्यांनी केला.

शाह म्हणाले की, स्वातंत्र्याला ८० वर्षे पूर्ण झाल्यानंतरही ‘वंदे मातरम्’ लाल किल्ल्यासह स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणाच्या सर्व ठिकाणी गायले गेले. काँग्रेसने मात्र त्याचा अपमान केला.

मंगळुरुत तक्रार

मंगळुरू : स्वातंत्र्यदिनाच्या काँग्रेस मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रगीत ‘वंदे मातरम’ गायनादरम्यान झालेल्या त्यांच्या हावभावांप्रकरणी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्याविरोधात भाजप नेत्यांनी येथील उरवा पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली.

भाजप नेते पुत्तूर म्हणाले की, जर राज्यातील काँग्रेस सरकार आणि पोलीस यात अपयशी ठरले, तर मी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करेन आणि मला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.

काँग्रेसचा पलटवार

गृहमंत्री स्वतःच्या आणि त्यांच्या ‘साहेबांच्या’ अवाढव्य अपयशांवरून लक्ष विचलित करण्यासाठी हे करत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

राष्ट्रीय गीताचे संपूर्ण गायन थांबवण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाही. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे बराच काळ उभे असल्याने त्यांच्यासाठी सोनिया गांधी खुर्ची मागत होत्या असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in