आज भाजपचा जाहीरनामा

पक्षाच्या मुख्यालयात जाहीरनामा घोषित करण्यात येणार असून त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पक्षाचे अन्य ज्येष्ठ नेतेही हजर असण्याची अपेक्षा आहे. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची रविवारी जयंती असून त्याचे औचित्य साधून जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे.
आज भाजपचा जाहीरनामा
Published on

नवी दिल्ली : लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजप आपला जाहीरनामा-संकल्पपत्र रविवारी जाहीर करणार असून त्यामध्ये कल्याणकारी आणि विकासाच्या योजनांसह विकसित भारतच्या मार्गदर्शक आराखड्याचा प्रामुख्याने समावेश असणे अपेक्षित आहे.

पक्षाच्या मुख्यालयात जाहीरनामा घोषित करण्यात येणार असून त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पक्षाचे अन्य ज्येष्ठ नेतेही हजर असण्याची अपेक्षा आहे. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची रविवारी जयंती असून त्याचे औचित्य साधून जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे. अयोध्येतील राम मंदिर, अनुच्छेद ३७० रद्द करण्यासह भाजपने बहुसंख्य आश्वासनांची पूर्तता केली असून आता हिंदुत्वाबाबत जाहीरनाम्यात काय आहे त्याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. युवक, महिला, शेतकरी आणि गरीब यांच्यासाठी जाहीरनाम्यात उपाय असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली भाजपने जाहीरनामा समिती स्थापन केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in