जागतिक महासत्तेचे स्वप्न भाजपच पूर्ण करील - गडकरी

जागतिक महासत्तेचे स्वप्न भाजपच पूर्ण करील - गडकरी

जयपूर येथे झोतवरा येथील भाजपचे उमेदवार राजवर्धनसिंह राठोड यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

जयपूर : जागतिक महासत्ता बनण्याचे भारताचे स्वप्न केवळ भारतीय जनता पक्षच पूर्ण करू शकेल, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी व्यक्त केले.

जयपूर येथे झोतवरा येथील भाजपचे उमेदवार राजवर्धनसिंह राठोड यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. गडकरी म्हणाले, ‘‘देशाला महासत्ता बनवायचे आहे. खेडी, गरीब मजूर आणि शेतकरी यांना भीती, भूक, दहशत आणि भ्रष्टाचारापासून मुक्त करायचे आहे. आपल्या देशाला जागतिक नेता, स्वयंभू बनवायचे आहे. फक्त भाजपच हे स्वप्न पूर्ण करू शकते. आम्ही स्वतःसाठी काम करत नाही तर देशासाठी काम करतो. आम्ही गरीबांसाठी काम करतो आणि म्हणूनच ही निवडणूक केवळ तुमच्या राज्याचेच नव्हे तर भारताचे भवितव्य बदलेल.’’

गडकरी म्हणाले की, ‘‘पाच वर्षांत डिझेल आणि पेट्रोलची वाहने क्वचितच दिसतील. फक्त इलेक्ट्रिक, इथेनॉल आणि हायड्रोजनची वाहने दिसतील. राजस्थानचे शेतकरी समृद्ध झाले तर देशातील शेतकरीही समृद्ध होतील. राजस्थानमध्ये प्रगती आणि समृद्धी आली तर ती देशातही येईल,’’ असेही ते म्हणाले. राजस्थानात २५ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका होणार असून, ३ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in