व्हीप असतानाही गैरहजर राहणाऱ्या खासदारांना भाजप पाठवणार नोटिसा

लोकसभेत एक देश, एक निवडणूक विधेयक सादर करण्यात आले, त्यावेळी व्हीप जारी केलेला असतानाही भाजपचे जे ११ खासदार गैरहजर होते, त्यांच्यावर नोटिसा बजावण्यात येणार असून त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचाही समावेश आहे.

संग्रहित छायाचित्र
Published on

लोकसभेत एक देश, एक निवडणूक विधेयक सादर करण्यात आले, त्यावेळी व्हीप जारी केलेला असतानाही भाजपचे जे ११ खासदार गैरहजर होते, त्यांच्यावर नोटिसा बजावण्यात येणार असून त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचाही समावेश आहे.

‘एनडीए’तील जनसेनाचे बालाशौरी वल्लभानेनी गैरहजर होते. आता पक्ष या गैरहजर राहणाऱ्या खासदारांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहे. त्यानंतर त्यांचे उत्तर आल्यावर निर्णय घेणार आहे. ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक सादर करण्यात आले तेव्हा समर्थनासाठी २६९ मते मिळाली. त्यानंतर सरकारवर प्रश्न उपस्थित होत आहेत. काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी केंद्र सरकारवर टीका करताना सांगितले की, सरकार साधारण बहुमत मिळवू शकले नाही. मग दोन तृतीयांश बहुमत कसे मिळवणार आहे.हे खासदार गैरहजरभाजपने सोमवारीच आपल्या खासदारांना उपस्थित राहण्यासाठी तीन ओळींचा व्हीप जारी केला होता. त्यानंतरही भाजपचे अनेक खासदार उपस्थित नव्हते. त्यामध्ये नितीन गडकरी, शांतनू ठाकूर, जगदंबिका पाल, बी. वाय. राघवेंद्र, गिरिराज सिंह, ज्योतिरादित्य शिंदे, विजय बघेल, उदयनराजे भोसले, भागीरथ चौधरी, जगन्नाथ सरकार आणि जयंत कुमार रॉय यांचा समावेश आहे.

भारतीय जनता पक्षाकडून गैरहजर राहिलेल्या खासदारांना नोटीस पाठवण्यात येणार आहेत. पक्षाचा व्हीप असताना एखादा खासदार गैरहजर राहिल्यास त्याला त्याचे कारण द्यावे लागते. ते कारण योग्य असेल तर पक्षाकडून कारवाई होत नाही. परंतु, कारण अयोग्य असेल तर पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. त्याचे सदस्यत्व रद्द होऊ शकते.लोकसभेत एक देश, एक निवडणूक विधेयक सादर करण्यात आले, त्यावेळी व्हीप जारी केलेला असतानाही भाजपचे जे ११ खासदार गैरहजर होते, त्यांच्यावर नोटिसा बजावण्यात येणार असून त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचाही समावेश आहे.

‘एनडीए’तील जनसेनाचे बालाशौरी वल्लभानेनी गैरहजर होते. आता पक्ष या गैरहजर राहणाऱ्या खासदारांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहे. त्यानंतर त्यांचे उत्तर आल्यावर निर्णय घेणार आहे. ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक सादर करण्यात आले तेव्हा समर्थनासाठी २६९ मते मिळाली. त्यानंतर सरकारवर प्रश्न उपस्थित होत आहेत. काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी केंद्र सरकारवर टीका करताना सांगितले की, सरकार साधारण बहुमत मिळवू शकले नाही. मग दोन तृतीयांश बहुमत कसे मिळवणार आहे.हे खासदार गैरहजरभाजपने सोमवारीच आपल्या खासदारांना उपस्थित राहण्यासाठी तीन ओळींचा व्हीप जारी केला होता. त्यानंतरही भाजपचे अनेक खासदार उपस्थित नव्हते. त्यामध्ये नितीन गडकरी, शांतनू ठाकूर, जगदंबिका पाल, बी. वाय. राघवेंद्र, गिरिराज सिंह, ज्योतिरादित्य शिंदे, विजय बघेल, उदयनराजे भोसले, भागीरथ चौधरी, जगन्नाथ सरकार आणि जयंत कुमार रॉय यांचा समावेश आहे.

भारतीय जनता पक्षाकडून गैरहजर राहिलेल्या खासदारांना नोटीस पाठवण्यात येणार आहेत. पक्षाचा व्हीप असताना एखादा खासदार गैरहजर राहिल्यास त्याला त्याचे कारण द्यावे लागते. ते कारण योग्य असेल तर पक्षाकडून कारवाई होत नाही. परंतु, कारण अयोग्य असेल तर पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. त्याचे सदस्यत्व रद्द होऊ शकते.

logo
marathi.freepressjournal.in