पोटनिवडणुकीत भाजपाचे वर्चस्व,लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या सात जागांसाठी निवडणुक

रामपूरमध्ये सपाचे असीम राजा आणि भाजपचे घनश्याम लोधी यांच्यात लढत होती
पोटनिवडणुकीत भाजपाचे वर्चस्व,लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या सात जागांसाठी निवडणुक
Published on

लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या सात जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने वर्चस्व राखले आहे.

उत्तर प्रदेशातील रामपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने विजय मिळवला आहे, तर आझमगडमध्येही विजय मिळवला आहे. रामपूरमध्ये भाजपच्या घनश्याम लोधी यांनी सपाचे उमेदवार असीम राजा यांच्यावर ४२ हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला. आझमगडमध्ये भाजपचे उमेदवार दिनेशलाल यादव निरहुआ आघाडीवर आहेत, तर सपाचे धर्मेंद्र यादव दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

रामपूरमध्ये सपाचे असीम राजा आणि भाजपचे घनश्याम लोधी यांच्यात लढत होती. आझमगडमध्ये सपाचे धर्मेंद्र यादव, भाजपचे दिनेशलाल यादव निरहुआ आणि बसपचे शाह आलम उर्फ ​​गुड्डू जमाली यांच्यात तिरंगी लढत होती.

पंजाबमधील संगरूर येथे शिरोमणी अकाली दल (अमृतसर)चे सिमरनजीत सिंग मान ५,८२२ मतांनी विजयी झाले. आम आदमी पक्षाचे गुरमेल सिंग दुसऱ्या, तर काँग्रेसचे दलवीर गोल्डी तिसऱ्या स्थानावर राहिले. येथे अकाली दल आणि भाजपच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. आझम खान यांच्या राजीनाम्यामुळे आझमगड आणि अखिलेश यांच्या राजीनाम्याने रामपूरची जागा रिक्त झाली होती. दोन्ही जागा यापूर्वी समाजवादी पक्षाच्या ताब्यात होत्या.

विधानसभेच्या सातही जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. ‘आप’ने दिल्लीतील राजेंद्रनगर जागा जिंकली आहे. त्याचवेळी त्रिपुरामध्ये भाजपने चारपैकी तीन जागा जिंकल्या आहेत आणि काँग्रेसने एक जागा जिंकली आहे. वायएसआर काँग्रेसने आंध्रप्रदेशातील आत्मकूर जागा जिंकली आहे. झारखंडमधील मंदार मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळवला आहे. भगवंत मान मुख्यमंत्री झाल्यानंतर रिक्त झालेल्या संगरूर लोकसभा जागेवर ‘आप’ने गुरमेल सिंग, काँग्रेसने दलवीर सिंग गोल्डी आणि भाजपने केवल धिल्लन यांना उमेदवारी दिली होती. सिमरनजीत सिंग मान यांना अकाली दलाने (अमृतसर) उमेदवारी दिली होती.

logo
marathi.freepressjournal.in