संसद भवनाच्या प्रवेशद्वारांवर धरणे, आंदोलनाला मनाई; लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा निर्णय

संसदेच्या संकुलात काँग्रेस-भाजप खासदारांच्या धक्काबुक्कीनंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
संसद भवनाच्या प्रवेशद्वारांवर धरणे, आंदोलनाला मनाई; लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा निर्णय
Published on

नवी दिल्ली : संसदेच्या संकुलात काँग्रेस-भाजप खासदारांच्या धक्काबुक्कीनंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता कोणत्याही राजकीय पक्ष किंवा खासदारांच्या गटाला संसद भवनाच्या गेटवर कसल्याही प्रकारचे धरणे किंवा आंदोलन करता येणार नाही. संसदेचे कामकाज सुरळीत पार पाडण्याच्या उद्देशाने हे कठोर निर्देश देण्यात आले आहेत.

या निर्देशांनंतर संसद भवनाच्या कोणत्याही गेटवर आंदोलन करता येणार नाही. लोकसभा अध्यक्ष कार्यालयाने हे निर्देश जारी करताना संसदेचे पावित्र्य राखण्यासाठी तसेच कामकाज सुरळीत चालण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

संसद भवनाच्या परिसरात इंडिया आघाडीच्या खासदारांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलेल्या विधानावरून आंदोलन धरणे, आंदोलनाला मनाई

केले जात असताना, गुरुवारी विरोध पक्षांचे खासदार आणि एनडीएचे खासदार आपापसात भिडल्याचे पाहायला मिळाले होते. यावर भाजपने आरोप केला की, त्यांचे दोन खासदार प्रताप चंद्र सारंगी आणि मुकेश राजपूत यांना विरोधी पक्षांच्या खासदारांनी ढकलून दिल्याने ते जखमी झाले आहेत. भाजप खासदार प्रताप चंद्र सारंगी यांनी दावा केला की राहुल गांधी यांनी एका खासदाराला ढकलले, ज्यामुळे ते खाली पडले.

काँग्रेसनेही या आरोपांचे खंडन करताना भाजपच्याच खासदारांनी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना ढकलून खाली पाडल्याचा आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाही धक्काबुक्की करून अडविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in