
जेलसमेर : राजस्थानमधील जैसलमेरमधील सादेवाला भागात भारत-पाकिस्तान सीमेजवळ एका मुलाचा आणि मुलीचा मृतदेह सापडला आहे. हे मृतदेह सुमारे ६-७ दिवसापूर्वीचे आहेत. मृतदेहांजवळ पाकिस्तानी सिम कार्ड आणि ओळखपत्रे सापडली आहेत त्यामुळे हे दोघेही पाकिस्तानी असल्याचे समोर आले आहे.
हे दोन्ही मृतदेह भारत-पाकिस्तान सीमेच्या कुंपणाच्या आत सुमारे १० ते १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या भारतीय सीमेवरील साडेवाला परिसरात आढळले. तनोट पोलिसांनी दोन्ही मृतदेह रामगड सीएचसीच्या शवागारात ठेवले आहेत. दोघांच्याही मृत्यूचे कारण शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल. हे दोघेही भारतातील आहेत की पाकिस्तानी आहेत याचा तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.
या दोघांच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या तरुणाचे नाव रवी कुमार वडिलांचे नाव दिवान जी, तर मुलीच्या कार्डवर शांती बाई असे नाव आहे. मुलगी अल्पवयीन असल्याचे सांगितले जात आहे. दोघेही एकाच जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातील रहिवासी आहेत.