‘बॉडी मसाजर’ म्हणजे ‘सेक्स टॉय’ नाही, त्यामुळे...; उच्च न्यायालयाने केले स्पष्ट

शरीराला मालिश करणाऱ्या (बॉडी मसाजर) यंत्राचे प्रौढांचे 'सेक्स टॉय' म्हणून वर्गीकरण करता येऊ शकत नाही. त्यामुळे...
‘बॉडी मसाजर’ म्हणजे ‘सेक्स टॉय’ नाही, त्यामुळे...; उच्च न्यायालयाने केले स्पष्ट
(छायाचित्र सौजन्य - freepik)

मुंबई : शरीराला मालिश करणाऱ्या (बॉडी मसाजर) यंत्राचे प्रौढांचे 'सेक्स टॉय' म्हणून वर्गीकरण करता येऊ शकत नाही. त्यामुळे त्याचा आयातीला प्रतिबंध असणाऱ्या वस्तूंच्या यादीत समावेश करता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

बॉडी मसाजर असलेला माल सीमाशुल्क विभागाने जप्त केला होता, त्यासंदर्भाने विभागाने जारी केलेला आदेश न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. किशोर संत यांच्या खंडपीठाने रद्द केला.

सीमाशुल्क आयुक्तांनी माल जप्त केला होता आणि बॉडी मसाजरचा वापर प्रौढांचे 'सेक्स टॉय' म्हणून केला जाऊ शकतो असे सांगून या वस्तू आयातीसाठी प्रतिबंधित असल्याचे म्हटले होते. बॉडी मसाजरचा वापर प्रौढांचे 'सेक्स टॉय' म्हणून केला जाऊ शकतो हा सीमाशुल्क आयुक्तांचा कल्पनाविलास आहे किंवा त्यांनी तसा समज करून घेतला आहे. देशांतर्गत बाजारपेठांमध्ये बॉडी मसाजरची विक्री होते आणि ती प्रतिबंधित वस्तू नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in