अयोध्येतील जागांवर बॉलीवूडचा डोळा! अमिताभ बच्चन यांनी १४.५ कोटींना विकत घेतला प्लॉट, लोढा ग्रुपचाही...

गुंतवणुकीच्या नावाखाली बॉलीवूडमधील अनेकांनी तेथील जागा विकत घेण्यास सुरुवात केली आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांनी शरयू येथे १० हजार स्क्वेअर फूटचा प्लॉट विकत घेतला आहे.
अयोध्येतील जागांवर बॉलीवूडचा डोळा! अमिताभ बच्चन यांनी १४.५ कोटींना विकत घेतला प्लॉट,
लोढा ग्रुपचाही...

प्रतिनिधी/मुंबई

अयोध्येतील राममंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर तेथील जागांना प्रचंड मागणी वाढली आहे. गुंतवणुकीच्या नावाखाली बॉलीवूडमधील अनेकांनी तेथील जागा विकत घेण्यास सुरुवात केली आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांनी शरयू येथे १० हजार स्क्वेअर फूटचा प्लॉट विकत घेतला आहे. त्याचबरोबर मुंबईतील ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ या समूहाने अयोध्येत सेव्हन स्टार इमारती बांधण्यासाठी जागा विकत घेतली आहे.

अमिताभ बच्चन यांनी या प्लॉटसाठी १४.५ कोटी रुपये मोजल्याचे समजते. लोढा समूहाने २२ जानेवारी रोजी अयोध्येत २५ एकर जागेवर विकास प्रकल्प संमिश्र पानावर

राबवत असल्याची घोषणा केली होती. पहिल्या टप्प्यात १,२५० स्क्वेअर फूटचा प्लॉट १.७२ कोटी रुपयांना विकण्यात आला होता. प्रत्येक टप्प्यात स्विमिंग पूल, पार्क, क्लब हाऊस अशा सुविधा असणार आहेत. या विकासकामानुसार, अयोध्येत रामनगरी उभी केली जाणार असून अध्यात्मावर ही थीम असणार आहे. यासाठी ब्रिटन, अमेरिका आणि दक्षिण पूर्व आशियातील अनिवासी भारतीयांनी या प्रकल्पात रूची दाखवली आहे.

अयोध्येतील मालमत्तांना फक्त स्थानिकांकडूनच नव्हे तर अयोध्येबाहेरील लोकांकडूनही मागणी वाढली आहे. मंदिराच्या परिसरातील जागा १० ते १५ हजार स्क्वेअर फूट दराने विकल्या जात आहेत. मंदिराच्या ६ ते १५ किलोमीटरपुढे जमिनींना ४ ते ९ हजार स्क्वेअर फूटचा भाव आला आहे. येत्या काही वर्षांत हे भाव गगनाला भिडण्याची शक्यता आहे, असे ॲॅनारॉक ग्रूपचे अध्यक्ष अनुज पूरी यांनी सांगितले.

देवकाली, चौदा कोसी परिक्रमा, रिंग रोड, नयाघाट आणि लखनौ-गोरखपूर हायवेडवळील जागांना सर्वात जास्त मागणी आहे. मंदिराच्या ६ ते २० किलोमीटर परिसरात गुंतवणूक करण्यास अनेकांनी पसंती दर्शवली आहे. गुरगावंच्या गीतांजली होमस्टेट या रिअल इस्टेट कंपनीचे संस्थापक सुनील सिसोदिया म्हणाले की, “सध्या अयोध्येत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच अनेक मेगाप्रकल्प होणार असल्यामुळे अयोध्येतील जागांना प्रचंड मागणी आली आहे. येत्या काही वर्षांत जागांचे भाव आणखीन ८ ते १० पटींनी वाढण्याची शक्यता आहे.

२०१९मध्ये सुप्रीम कोर्टाने राम मंदिराच्या बाजुने निकाल दिला आणि आता अयोध्येतील मंदिर सर्वसामान्य जनतेसाठी खुले झाले. त्यामुळे २०१७ ते २०२२ या कालावधीत नोंदणी कार्यालयात मालमत्तांच्या खरेदी-विक्री प्रकरणात १२० टक्क्यांनी वाढ झाल्याचे अयोध्या जिल्ह्यातील मुद्रांक आणि नोंदणी विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.

जमिनीचे भाव ५ ते ८ पटींनी वाढले

ऑगस्ट २०२०मध्ये राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाल्यानंतर अयोध्येतील जागांचे भाव ५ ते ८ पटींनी वाढले आहेत. काही ब्रोकर्सच्या मते, अयोध्येतील काही भागातील जमिनींचे भाव हे सर्वसामान्यांच्या तसेच तेथील स्थानिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. मुंबई, नवी दिल्ली आणि अन्य जिल्ह्यातील रिअल इस्टेट व्यावसायिकांनी अयोध्येवर लक्ष केंद्रित केल्यानंतर तेथील जमिनी सोन्याच्या भावाने विकल्या जात आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in