Bollywood News : आणखी एक अभिनेता रेव्ह पार्टी ड्रग्स प्रकरणात दोषी, पोलिसांकडून अटक

ड्रग्ज सेवन करणाऱ्या 6 लोकांमध्ये त्याचा समावेश आहे. गुप्त माहितीच्या आधारे कारवाई
Bollywood News : आणखी एक अभिनेता रेव्ह पार्टी ड्रग्स प्रकरणात दोषी, पोलिसांकडून अटक
Published on

बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर याला रविवारी रात्री बेंगळुरू येथील एका हॉटेलमधील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यादरम्यान ताब्यात घेण्यात आले आहे. बंगळुरू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्ज सेवन करणाऱ्या 6 लोकांमध्ये त्याचा समावेश आहे. गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी एमजी रोडवरील एका हॉटेलवर छापा टाकला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथे रेव्ह पार्टी सुरू होती.

पोलिसांनी छापा टाकल्यानंतर रेव्ह पार्टीत अमली पदार्थ सेवन केल्याच्या संशयावरून काही लोकांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे लोक अंमली पदार्थांचे सेवन करून पार्टीला आधीच पोहोचले होते की हॉटेलमध्ये सेवन केले होते, हे स्पष्ट झालेले नाही.

logo
marathi.freepressjournal.in