प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपमध्ये प्रवेश; लोकसभा निवडणूक लढणार? म्हणाल्या - "जो काही सल्ला ते देतील..."

"मी सनातनशी (धर्म) घट्ट संबंध असलेल्या सरकारमध्ये सामील होत आहे याचा मला आनंद आहे. आज मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे हे माझे भाग्य आहे"
प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपमध्ये प्रवेश; लोकसभा निवडणूक लढणार?  म्हणाल्या - "जो काही सल्ला ते देतील..."

प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर आणि भजन गायिका अनुराधा पौडवाल यांनी आज (दि.16 शनिवारी) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधी पौडवाल यांनी भाजप प्रवेश केल्याने त्यांना लोकसभेचे तिकिट दिले जाईल अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तर, निवडणुकीसाठी पक्ष त्यांना मोठी जबाबदारी देऊ शकतो, त्या पक्षाच्या स्टार निवडणूक प्रचारक असू शकतात, असेही सांगितले जात आहे.

भाजपमध्ये प्रवेशानंतर पौडवाल यांनी माध्यमांशी बोलताना, "मी सनातनशी (धर्म) घट्ट संबंध असलेल्या सरकारमध्ये सामील होत आहे याचा मला आनंद आहे. आज मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे हे माझे भाग्य आहे" असे म्हटले. मी स्वतः अध्यात्मात गेल्या 35 वर्षांपासून आहे. आज देश जिथे आहे तो सनातन धर्मियांसाठी खूप मोठा टप्पा आहे, खूप वर्षांनी इतका मोठा टप्पा आलाय. त्याची आपण प्रशंसा करायला हवी, असेही त्या पुढे म्हणाल्या. लोकसभेची निवडणूक लढवणार का असे विचारला असता, "मला अद्याप माहिती नाही, ते जो काही सल्ला देतील त्यानुसार बघू" असेही त्यांनी म्हटले आहे.

27 ऑक्टोबर 1954 रोजी मुंबईत जन्मलेल्या अनुराधा यांनी 1973 मध्ये अमिताभ बच्चन आणि जया प्रदा यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'अभिमान' या चित्रपटातून गायनाच्या कारकिर्दीची सुरुवात केली. पाच दशकांच्या कारकिर्दीत, अनुराधा पौडवाल यांनी गुजराती, हिंदी, कन्नड, मराठी, संस्कृत, बंगाली, तमिळ, तेलुगू, उडिया, आसामी, पंजाबी, भोजपुरी, नेपाळी आणि मैथिली भाषांमध्ये 9,000 हून अधिक गाणी आणि 1,500 हून अधिक भजने रचली आहेत. 'आशिकी', 'दिल है की मानता नहीं' आणि 'बेटा' या चित्रपटांसाठी अनुराधा पौडवाल यांना फिल्मफेअर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in