बुकी अनिल जयसिंघानीची सीबीआय, एनआयएकडून चौकशी होणार ; दुबईतील ‘डी’ कंपनीच्या बुकींशी संबंध

आयपीएल सामन्यांमध्ये शेकडो कोटी रुपयांचे बेटिंग व हवाला व्यवहार चालत असल्याचे उघड झाले. या कॉल रेकॉर्डिंगमुळे अनिल जयसिंघानीविरोधात सुरू असलेल्या खटल्याच्या तपासात मोठे बळ मिळणार
बुकी अनिल जयसिंघानीची सीबीआय, एनआयएकडून चौकशी होणार ; दुबईतील ‘डी’ कंपनीच्या बुकींशी संबंध

बुकी आणि हवाला ऑपरेटर अनिल जयसिंघानी याच्याकडून जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमुळे क्रिकेट बेटिंग, हवाला व्यवहार, अमली पदार्थ, खंडणी, धमक्या या अवैध व्यवसायाच्या साम्राज्याचा खजिना उघड झाल्याचे सिद्ध होत आहे. दरम्यान, जयसिंघानी याचे ‘डी’ कंपनीशी संबंधित दुबईतील बुकींशी संबंध उघड झाल्यावर एनआयए, सीबीआय या तपास यंत्रणांना त्याची चौकशी करायची आहे.

विशेष इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमधील ऑडिओ क्लीप ‘नवशक्ति’ला मिळाली आहे. ही क्लीप अनिल जयसिंघानीकडून जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमधून सापडली आहे. यातून प्रत्येक आयपीएल सामन्यांमध्ये शेकडो कोटी रुपयांचे बेटिंग व हवाला व्यवहार चालत असल्याचे उघड झाले. या कॉल रेकॉर्डिंगमुळे अनिल जयसिंघानीविरोधात सुरू असलेल्या खटल्याच्या तपासात मोठे बळ मिळणार आहे.

बुकी मुर्तझा व अनिल जयसिंघानी यांचा मुलगा अक्षन यांच्यातील संभाषण रेकॉर्ड झाले आहे. आयपीएल क्रिकेट बेटिंगमधील ६४० कोटी रुपयांचे पेमेंट देण्याबाबत चर्चा झाली. त्यात नंतर अनिल जयसिंघानी सहभागी झाला. तो पुढील पेमेंटची मागणी करत होता. हा कॉल रेकॉर्ड अनिल जयसिंघानीने स्वत: केला. त्यानंतर याचा वापर त्याने मुर्तुझा बुकीला ब्लॅकमेलिंगसाठी केला.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हा आवाज अनिल जयसिंघानी याचा आहे. फोन कॉल रेकॉर्ड करणे ही जयसिंघानी याची सवय होती. त्यानंतर तो त्याचे संभाषण अमली पदार्थ व मॅच फिक्सिंग, त्यानंतर तो पेमेंटवरून ब्लॅकमेलिंग करत होता.

बुकी मुर्तुझा आणि अनिल जयसिंघानी यांचा मुलगा अक्षन यांच्यातील रेकॉर्ड केलेले संभाषण आयपीएल क्रिकेट सट्टेबाजीची ६४० कोटी रुपयांची देयके देण्याबाबत बोलतो आणि नंतर अनिल जयसिंघानी पुढे पैसे देण्याबाबत वाद घालतो. त्यावर मुर्तुझा म्हणाला की, माझे खूप नुकसान झाले आहे आणि जयसिंघानीच्या अवैध व्यवहारामुळे माझे जेवणाचेही वांधे झाले आहेत. त्यानंतर अक्षन त्याचे संभाषण अमली पदार्थांच्या तस्करीच्या धंद्याकडे वळवतो. हा विषय काढल्याने मुर्तुझा निषेध करतो. त्यानंतर अनिल जयसिंघानी त्यांच्या संभाषणात सामील होतो व मुर्तुझाला धमकावतो.

क्रिकेट बेटिंगमध्ये हरलेल्या अनिल जयसिंघानीच्या सट्टेबाजी आयडीत १४०० कोटी रुपये कमावल्याबद्दल मुर्तुझाने विनवणी केली आणि त्याच्याकडे फक्त १३५ कोटी रुपये शिल्लक होते. “आज मी पाहतो तर माझ्याकडे १६९ कोटी आहेत. जिंकण्यासाठी जितके दिले तितके तू तीन दिवसांत हरलास. तुझ्या आयडीत १०० कोटींपेक्षा अधिक नव्हते, असे मुर्तुझाने सांगितले.

‘ईडी’च्या म्हणण्यानुसार, अनिल जयसिंघानीने १० हजार कोटींचे हवाला व्यवहार केले आहेत. त्याचे धागेदोरे दुबई व कराचीत मिळाले आहेत. इंग्लंड आणि युरोपमध्ये शिकणाऱ्या भारतीय आणि पाकिस्तानी विद्यार्थ्यांच्या नावाने मिळालेल्या क्रेडिट कार्डचा वापर करून इंग्लंडमधील क्रीडा वेबसाइट बेटफेअर.कॉमवर आयडी देऊन सट्टे स्वीकारणाऱ्या क्रिकेट बुकींचा एक गट त्याने चालवला होता.

अनिलने बेटफेअरचे उच्चाधिकारी ॲँड्रयू रिडेल यांना आमंत्रित केले होते. त्यांची सोय दिल्लीतील हॉटेल ला मेरिडियनमध्ये केली होती. तेथे अनेक बुकींशी बैठक घेतली. त्यात आयपीएल सामन्यात सुरक्षित बेटिंग करण्याचे प्लॅनिंग केले.

अनिलचा खास दिल्लीतील सुरिंदर मणी याने सर्व आर्थिक व्यवहार सांभाळले. त्यानंतर ते पैसे दुबई व कराचीत हवालामार्फत पोहचवले. अनिलच्या इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसमधून आयपीएलमध्ये मॅच फिक्सिंग करणाऱ्या मोठ्या बुकींची ओळख उघड झाली आहे. त्यात मुकेश शर्मा, सोनू सचदेवा ऊर्फ सोनू मग्गू, राहुल गंगवाल, विनीत गंगवाल, अरुण गुप्ता, मनोज जैन, अमन कपूर, विकी सोनीपत, मोनू, आशू आदींची नावे उघड झाली.

logo
marathi.freepressjournal.in