सीमा सुरक्षा दलाकडून सव्वादोन कोटींचे सोने जप्त

शनिवारी दोघांना अटक केली. दुसऱ्या घटनेत, एक किलोपेक्षा जास्त वजनाची सोन्याची पेस्ट जप्त करण्यात आली.
सीमा सुरक्षा दलाकडून सव्वादोन कोटींचे सोने जप्त

बारासत (प. बंगाल) : पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील पेट्रापोल येथे भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवरून २.२५ कोटी रुपयांच्या सोन्याची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

गुप्त माहितीच्या आधारे बीएसएफच्या जवानांनी बांगलादेशातून भारतात प्रवेश करणाऱ्या ट्रकची झडती घेतली आणि एका वाहनातून १.५८ कोटी रुपयांची अडीच किलो सोन्याची बिस्किटे जप्त केली. शनिवारी दोघांना अटक केली. दुसऱ्या घटनेत, एक किलोपेक्षा जास्त वजनाची सोन्याची पेस्ट जप्त करण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in