सीमावर्ती ग्रामस्थांचा सुटकेचा नि:श्वास

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या युद्धविरामाने सीमावर्ती राज्यातील नागरिकांनी आता सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मागील काही दिवसांपासून ते सतत भितीच्या सावटाखाली वावरत होते.
सीमावर्ती ग्रामस्थांचा सुटकेचा नि:श्वास
Published on

श्रीनगर : भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या युद्धविरामाने सीमावर्ती राज्यातील नागरिकांनी आता सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मागील काही दिवसांपासून ते सतत भितीच्या सावटाखाली वावरत होते.

दरम्यान, गेल्या चार दिवसांत पाकिस्तानकडून नागरी भागांवर वाढत्या गोळीबारामुळे काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील तीन जिल्ह्यांतील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर आपले घर सोडून सुरक्षित भागात स्थलांतर केले आहे.

बारामुल्ला, बांदीपोरा आणि कुपवारा या जिल्ह्यांमधील १.१ लाख लोकांनी आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे. पाकिस्तानी गोळीबारामुळे अनेक घरे आणि शासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे.

इर्शाद अहमद ख्वाजा या सीमावर्ती गावातील रहिवाशाने सांगितले, आपले संपूर्ण आयुष्य जिथे गेले ते ठिकाण सोडणे सोपे नसते. पण माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जीवाला मोठा धोका असल्याने हे पाऊल उचलावे लागले. ते सध्या बारामुल्लामध्ये नातेवाइकांच्या घरी राहत आहेत. “माझी काळजी घेतली जाईल याची खात्री आहे, पण तरीही मी खूप दुःखी आहे. हे घर सोडणे खूप कठीण आहे, असे ते म्हणाले.

बोनियार, उरी येथील रहिवासी मुबीन अहमद म्हणाले, १९९० च्या दशकापासून आम्ही सीमापार गोळीबार पाहिला आहे, पण यावेळी गोळीबाराची तीव्रता खूप जास्त आहे. आता जे भाग पूर्वी सुरक्षित मानले जायचे, तिथेही गोळ्या पडत आहेत.

ते म्हणाले की, मालमत्ताधारकांना चोरी आणि घरफोडीचीही भीती वाटत आहे. अराजकतेचा फायदा घेऊन काही अपप्रवृत्ती आपले कृत्य करत असतात. स्थलांतर प्रक्रिया त्यानंतर सुरू झाली जेव्हा पाकिस्तानने भारतीय लष्कराच्या दहशतवादी पायाभूत रचनेवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रत्युत्तर देत नागरी भागांवर अनियंत्रित गोळीबार सुरू केला. गोळीबारात महिलेला जीव गमवावा लागला.

  • प्रशासनाने तात्पुरत्या निवारा केंद्रांची उभारणी केली आहे. बारामुल्लामध्ये अनेक शैक्षणिक संस्थांना तात्पुरत्या निवासस्थानी रूपांतरित करण्यात आले आहे.

  • हनीफा मॉडेल स्कूल, शीरीच्या प्राचार्या रशिदा मकबूल म्हणाल्या, आमच्या कर्मचा-यांनी दिवसरात्र मेहनत घेऊन या निवासव्यवस्था तयार केल्या. या कुटुंबांनी खूप काही गमावले आहे. आम्हाला त्यांना सुरक्षित निवारा आणि मूलभूत गरजा पुरवायच्या आहेत.

  • राहत आणि पुनर्वसन विभागाचे नोडल अधिकारी रेयाज अहमद गणाई म्हणाले, सर्व विभाग समन्वयाने काम करत आहेत. वीज वितरण विभागापासून ते आरोग्य विभागाच्या वैद्यकीय शिबिरांपर्यंत सर्वांनी योगदान दिले आहे.

logo
marathi.freepressjournal.in