Kailash Kher : कार्यक्रम सुरु असताना गायक कैलाश खैरवर फेकली बाटली ; पोलिसांनी केली आरोपीला अटक

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक कैलास खैरवर (Kailash Kher) कर्नाटकातील एका संगीत कार्यक्रमादरम्यान बॉटल फेकून मारण्याचा घडला प्रकार
Kailash Kher : कार्यक्रम सुरु असताना गायक कैलाश खैरवर फेकली बाटली ; पोलिसांनी केली आरोपीला अटक

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक कैलास खैर (Kailash Kher) याच्यावर २९ जानेवारीला कर्नाटकातील एका संगीत कार्यक्रमामध्ये बॉटल फेकून मारण्याचा प्रकार समोर आला. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका व्यक्तीला अटक केली असून पुढील तपास चालू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २९ जानेवारीला कैलास खैरचा एक संगीत कार्यक्रम होता. यादरम्यान कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या व्यक्तीपैकी एकाने त्यांच्यावर बॉटल फेकून मारली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्या व्यक्तीला तातडीने ताब्यात घेतले. या हल्ल्यामागे नेमके कारण काय? हे मात्र अद्याप समजू शकले नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in