सिलिंडरनंतर आता बाटलीबंद पाणीही मिळणे होणार मुश्किल; भारतासमोर नवे संकट

अमेरिका-इस्रायल युद्धांमुळे विविध व्यवसायांबरोबरच बाटलीबंद पाण्याच्या उद्योगावरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. भारतातील बाटलीबंद पाण्याची बाजारपेठ अंदाजे ५ अब्ज डॉलरच्या किमतीची आहे आणि युद्धाचा त्यावर परिणाम होत असल्याचे बोलले जात आहे.
सिलिंडरनंतर आता बाटलीबंद पाणीही मिळणे होणार मुश्किल; भारतासमोर नवे संकट
सिलिंडरनंतर आता बाटलीबंद पाणीही मिळणे होणार मुश्किल; भारतासमोर नवे संकट
Published on

नवी दिल्ली : अमेरिका-इस्रायल युद्धांमुळे विविध व्यवसायांबरोबरच बाटलीबंद पाण्याच्या उद्योगावरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. भारतातील बाटलीबंद पाण्याची बाजारपेठ अंदाजे ५ अब्ज डॉलरच्या किमतीची आहे आणि युद्धाचा त्यावर परिणाम होत असल्याचे बोलले जात आहे. या उद्योगातील सूत्रांचा हवाला देऊन एका वृत्तसंस्थेने असा दावा केला आहे की, युद्धामुळे भारतात बाटलीबंद पाण्याच्या किमती वाढू शकतात.

तेलाच्या वाढत्या किमतींमुळे पॉलिमरची किंमत वाढली आहे, ते कच्च्या तेलापासून बनवले जाते आणि तो प्लास्टिक बाटल्यांच्या उद्योगातील उत्पादनात एक महत्त्वाचा घटक आहेत. प्लास्टिकच्या बाटल्या बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याची किंमत ५० टक्क्यांनी वाढून प्रति किलोग्रामसाठी १७० रुपये इतकी झाली आहे. तर बाटलीच्या झाकणांची किंमत ही दुप्पटीपेक्षा जास्त वाढून ०.४५ रुपये प्रति नग इतकी झाली आहे. तसेच लेबल्स आणि चिकटवण्यासाठी वापरण्यात येणारी टेपही प्रचंड महाग झाली आहे, असे ‘ऑल इंडिया पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’च्या फेडरेशनचे म्हणणे आहे.

वास्तविक या युद्धामुळे प्लास्टिकच्या बाटल्यांपासून ते लेबल आणि कार्डबोर्ड बॉक्सपर्यंत अनेक वस्तूंच्या किमती वाढल्याचे म्हटले जाते. भारत ही जगातील सर्वात मोठ्या बाटलीबंद पाण्याच्या बाजारपेठांपैकी एक असून त्यामुळे बाटलीच्या किमतीत कोणताही बदल झाल्यास किरकोळ बाजारावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. मात्र अजून तरी किरकोळ बाजारावर कोणताही परिणाम झालेला नाही.

युनिट्सवर परिणाम

भारतातील एकूण प्लास्टिक उत्पादनापैकी गुजरातमधील प्लास्टिक उत्पादन क्षेत्राचा वाटा अंदाजे ३५ ते ४० टक्के आहे. येथे १० हजारांहून अधिक युनिट्स आहेत. इस्रायल-इराण संघर्षानंतर पॉलिमरच्या किमतीत झालेल्या तीव्र वाढीचा या प्रदेशावर गंभीर परिणाम झाला आहे. उद्योग क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे की केवळ १२ दिवसांत पीईटी पॉलिमरच्या किमती अंदाजे ४० टक्के वाढल्या आहेत. उन्हाळ्यात पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची मागणी वाढत असल्याने उत्पादनावर दबाव वाढला आहे.

logo
marathi.freepressjournal.in