
नवी दिल्ली : अवैध बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना भारतात घुसण्यास मदत करणाऱ्या नेटवर्कवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली पोलिसांना दिले आहेत. हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असून त्यावर कठोर कारवाई केली पाहिजे.
शहा यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, गृहमंत्री आशिष सूद, दिल्लीचे पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली.
शहरातील आंतरराज्य टोळ्यांचा निर्दयपणे नायनाट करणे, हे दिल्ली पोलिसांचे प्राधान्य असले पाहिजे. अंमली पदार्थांचे नेटवर्क मुळापासून संपवावे. बांग्लादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना देशात घुसण्यास मदत करणाऱ्या संपूर्ण नेटवर्कवर कठोर कारवाई करण्यात यावी, त्यांची ओळख पटवून त्यांना हद्दपार करावे, असे शाहांनी स्पष्टपणे सांगितले.
दिल्लीतील बांधकामाशी संबंधित प्रकरणांमध्ये दिल्ली पोलिसांच्या परवानगीची गरज भासणार नाही, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिले. २०२० च्या दिल्ली दंगलीच्या खटल्यांचा जलद निपटारा करण्यासाठी दिल्ली सरकारने विशेष अभियोजकांची नियुक्ती करावी, जेणेकरुन ही प्रकरणे लवकर निकाली काढता येतील. दिल्ली पोलिसांनी लवकरच अतिरिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करावी. डीसीपी स्तरावरील अधिकाऱ्यांनी पोलिस स्टेशन स्तरावर जाऊन जनसुनावणी शिबिरे आयोजित करून जनतेच्या समस्या सोडवाव्यात, असेही त्यांनी निर्देश दिले.
दिल्लीतील बांधकामाशी संबंधित प्रकरणांमध्ये दिल्ली पोलिसांच्या परवानगीची गरज भासणार नाही, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिले. दिल्ली दंगलीच्या खटल्यांचा जलद निपटारा करण्यासाठी दिल्ली सरकारने विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी, जेणेकरुन ही प्रकरणे लवकर निकाली काढता येतील. दिल्ली पोलिसांनी लवकरच अतिरिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करावी. डीसीपी स्तरावरील अधिकाऱ्यांनी पोलिस स्टेशन स्तरावर जाऊन जनसुनावणी शिबिरे आयोजित करून जनतेच्या समस्या सोडवाव्यात, असेही त्यांनी निर्देश दिले.