४५ वर्षाचा विक्रम मोडत यमुनेने धारण केले रौद्ररुप ; मुख्यमंत्री केजरीवालांनी बोलावली महत्वाची बैठक

या आठवड्यात देखील दिल्ली-एनसीआरमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून १५ आणि १६ तारखेला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
४५ वर्षाचा विक्रम मोडत यमुनेने धारण केले रौद्ररुप ; मुख्यमंत्री केजरीवालांनी बोलावली महत्वाची बैठक

उत्तर भारताता सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुराच्या पाण्यामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले असून अनेकांना आपलं घर सोडून इतर ठिकाणी हलवण्यात आलं आहे. यमुना नदिच्या पाणी पातळीत वाढत असल्याने दिल्लीकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. या आठवड्यात देखील दिल्ली-एनसीआरमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून १५ आणि १६ तारखेला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यंदा यमुनेच्या पाणीपातळीने मागील ४५ वर्षांचा विक्रम मोडला आहे. आज दुपारच्या सुमारास यमुनेची पाणी पातळी २०७.५५ मीटरवर पोहचली आहे. यापूर्वी १९७८ साली यमुनेची पाणीपातळी २०७.४९ मीटरवर पोहचली होती. सध्या नदीचे पाणी नोएडा-दिल्ली लिंक रोडपर्यंत पोहोचले आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.

यात उत्तराखंड, उत्तर प्रदेश मिळून गेल्या २४ तासांत १६ जणांचा बळी गेला आहे. तर मागील तीन दिवसात हिमाचल प्रदेशात ३१ जणांना आपल्या प्राणांना मुकावे लागणार आहे. जम्मू-श्रीनगर महामार्ग, मनाली-लेह, मनाली-चंदीगड, राष्ट्रीय महामार्गासह १५००हुन अधिक रस्ते भूस्खलनामुळे बंद झाले आहे. पंजाब-हरियाणामध्ये तीन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे कोट्यवधींच्या मालमत्तेचं नुकसान झालं आहे. या दोन्ही राज्यात देखील अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत, तर पिकांचं मोठं नुकसान झालं असल्याचं अधिकांऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मोहाली, पटियाला, अंबाला, रुपनगर आणि पंचकुला यासह बाधित जिल्ह्यांमध्ये मदतकेंद्र उभारण्यात आली आहेत. पंजाबच्या रुपनगर जिल्ह्यात एनडीआरएफच्या पाच टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

यमुनेने रुद्रावतार धारण केला असून यमुना खोऱ्यातून बाहेर काढलेल्यांसाठी चिल्ला ते एनएच २४ डीएनडी ते निजामुद्दीन फ्यायओव्हर आणि यमुना बँक ते आटीओ ब्रिजपर्यंत शिबिरे उभारण्यात आली असून या ठिकाणी खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच अनेक मदत गटांनी वैद्यकीय शिबिरेही लावली आहेत. नोएडा-दिल्ली लिंक रोडवर सुमारे १००० मदत शिबिरे उभारण्यात आली असून याठिकाणी फिरती शौचालये बसवण्याची तयारी सुरु करण्यात आली

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in