BRICS Summit 2026 : नवीन विमा व्यवस्थेचा व्लादिमीर पुतीन यांचा प्रस्ताव

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रविवारी ब्रिक्स देशांमध्ये नवीन विमा व्यवस्था आणि धान्य बाजारासाठी सहकार्यात्मक उपक्रमाचा प्रस्ताव दिला.
BRICS Summit 2026 : नवीन विमा व्यवस्थेचा व्लादिमीर पुतीन यांचा प्रस्ताव
BRICS Summit 2026 : नवीन विमा व्यवस्थेचा व्लादिमीर पुतीन यांचा प्रस्तावसंग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रविवारी ब्रिक्स देशांमध्ये नवीन विमा व्यवस्था आणि धान्य बाजारासाठी सहकार्यात्मक उपक्रमाचा प्रस्ताव दिला.

युक्रेनवरील युद्धामुळे पाश्चात्य महासत्तांनी मॉस्कोवर लादलेल्या अत्यंत कठोर निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर, पुतीन यांनी ब्रिक्स सदस्य देश तसेच 'ग्लोबल साउथमधील' (दक्षिण गोलार्धातील विकसनशील) देशांमधील आर्थिक वाढीसाठी या नवीन उपक्रमांचा प्रस्ताव मांडला.

जी-७ देश, युरोपियन युनियन आणि ब्रिटनने पाश्चात्य कंपन्यांना रशियन कच्च्या तेलाची वाहतूक करणाऱ्या कोणत्याही जहाजाचा विमा उतरवण्यास बंदी घातली होती, (जोपर्यंत ते तेल विशिष्ट किंमत मर्यादेवर किंवा त्यापेक्षा कमी किमतीत खरेदी केले जात नाही). विमा क्षेत्राशी संबंधित या निर्बंधांचा रशियाच्या कच्च्या तेलाच्या निर्यातीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in