Morbi bridge collapse : गुजरातच्या मोरबीत पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 141 जणांचा मृत्यू ; रेस्क्यू ऑपरेशन सुरू

400 हून अधिक लोक नदीत पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. एनडीआरएफ आणि गरूड कमांडो घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य करत आहेत
Morbi bridge collapse : गुजरातच्या मोरबीत पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 141 जणांचा मृत्यू ; रेस्क्यू ऑपरेशन सुरू

गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात एक झुलता पूल कोसळला (Morbi bridge collapse) असून त्यात 140 जणांचा मृत्यू झाला आहे. नदीत पडलेल्या लोकांचा शोध घेण्यात येत असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती गुजरात सरकारने दिली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

गुजरातमधील मोरबी येथे काल संध्याकाळी मोठी दुर्घटना घडली. मोरबी जिल्ह्यातील मच्छू नदीवरील झुलता पूल अचानक कोसळला. या अपघातात 140 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 400 हून अधिक लोक नदीत पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. एनडीआरएफ आणि गरूड कमांडो घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य करत आहेत. दरम्यान, या पुलाची १५ दिवसांपूर्वीच दुरुस्ती करण्यात आली होती. त्यामुळे पुलाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुलाची देखभाल करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी एसआयटीही स्थापन करण्यात आली आहे.

100 लोकांची क्षमता असलेल्या पुलावर अपघात झाला त्यावेळी 400 लोक उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबाबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. बचाव कार्यासाठी तातडीने पथके पाठवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यासंदर्भात ट्विट केले आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी आज घटनास्थळाला भेट देण्याची शक्यता आहे. मोरबीतील आकर्षणाचा केंद्रबिंदू हा पूल होता. मोरबीतील मच्छू नदीवर बांधलेला हा झुलता पूल एक, दोन वर्षे जुना नाही, तर 140 वर्षे जुना आहे. या पुलाचा इतिहास सुमारे 140 वर्षांचा आहे. या पुलाबद्दल बोलायचे झाले तर ते गुजरातमधील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. येथे दररोज मोठ्या संख्येने लोक येतात. या पुलाचे वैशिष्ट्य म्हणजे हा झुलता पूल आहे. रविवारी या पुलावर 500-700 लोक जमा झाल्याने पुलाचा भार सहन न झाल्याने पूल कोसळून नदीत पडला. 

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in