Budget 2023 : मोठी बातमी... आता सात लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असेल

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात कर स्लॅबची घोषणा केली
Budget 2023 : मोठी बातमी... आता सात लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असेल

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सादर केलेल्या पूर्ण अर्थसंकल्पात करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. टॅक्स स्लॅबमध्ये बदल होईल, अशी अपेक्षा होती. आता करपात्र उत्पन्न मर्यादा सात लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र, हा लाभ नवीन कर रचनेनुसार करदात्यांना आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात कर स्लॅबची घोषणा केली. आता सात लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असेल. हा फायदा नवीन कर रचनेनुसार करदात्यांना आहे.

आर्थिक तज्ज्ञांनी आयकर सवलत मर्यादा 2.50 लाखांवरून 5 लाखांपर्यंत वाढवण्याची गरज व्यक्त केली होती. गेल्या काही वर्षांपासून कर स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता. सरकारने कर स्लॅब वाढवल्यास, करदाते पैसे वाचवण्यापासून खरेदी आणि गुंतवणुकीकडे वळतील. याचा अर्थव्यवस्थेला फायदा होईल, असा अंदाज आर्थिक तज्ज्ञांनी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in