Budget 2024 : युवकांना प्रशिक्षण; शिक्षण आणि शेती क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात काय तरतूद?

स्किल इंडिया अंतर्गत 1.47 कोटी युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच, 1.8 कोटी युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. युवकांना जास्तीत...
Budget 2024 : युवकांना प्रशिक्षण; शिक्षण आणि शेती क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात काय तरतूद?
Published on

आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी सीतारामन यांनी शिक्षण, शेती, रोजगार यासंदर्भात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या.

नव्या इन्स्टिट्यूटची स्थापना करणार-

अर्थसंकल्प सादर करताना सीतारामन यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे बदल करण्यात आले असल्याचे सांगितले. 3000 नव्या ITI ची स्थापना करण्यात येणार आहे. याच बरोबर सात आयआयटी, सात आयआयएम, 15 एम्स आणि 390 विद्यापीठांची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच, देशात 157 नवीन नर्सिंग कॉलेज सुरु करण्याची घोषणाही त्यांनी केली. या वर्षी शिक्षण क्षेत्रासाठी 1,12,898.97 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

अर्थसंकल्प सादर करताना नवे मेडिकल कॉलेज सुरू करण्याची सरकारची योजना असून या संदर्भात एका कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच रुग्णालयांच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरही भर देण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या.

स्किल इंडियामध्ये तरुणांना प्रशिक्षण-

स्किल इंडिया अंतर्गत 1.47 कोटी युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच, 1.8 कोटी युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. युवकांना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी मिळण्यासाठी अनेक योजना आणण्यात आल्या आहे. स्टार्टअप गॅरंटी स्कीम, फंड ऑफ फंड्स आणि स्टार्टअप इंडियाद्वारे युवकांना रोजगार मिळण्यास मदत झाली आहे. तसेच, पुढेही तरुणांना मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतीबाबत काय म्हणाल्या सीतारामन?

पीएम केअर रिफॉर्म योजनेचा दरवर्षी 8 कोटी शेतकऱ्यांना फायदा होतो. तर, पीएम पीकविमा योजनेचा 4 कोटी शेतकऱ्यांना फायदा होतो. अशी माहिती त्यांनी दिली. तसेच, शेतीसाठी अधुनिक साठवण करण्याकडे सरकारचा कल असून पुरवठा साखळीवर सरकार भर देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, सरकार मोहरी आणि भूईमूंग लागवडीला अधिक प्रोत्साहन देणार असून मत्स्यपालन योजनेला चालना देण्यासाठी काम केले जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पीएम किसान योजनेतील घर 70 टक्के महिलांना देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

logo
marathi.freepressjournal.in