अर्थमंत्र्यांकडून अर्थसंकल्पीय योजनांच्या अंमलबजावणीच्या प्रगतीचा आढावा

कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणी व्हावी
अर्थमंत्र्यांकडून अर्थसंकल्पीय योजनांच्या
अंमलबजावणीच्या प्रगतीचा आढावा

नवी दिल्ली:अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी वित्त मंत्रालयाच्या सचिवांसह आणि कॉर्पोरेट व्यवहार सचिवांसोबत अर्थसंकल्पीय योजनांच्या अंमलबजावणीच्या प्रगतीचा आढावा घेतला.

या बैठकीला आर्थिक व्यवहार सचिव अजय सेठ, गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन (डीआयपीएएम) विभागाचे सचिव तुहिन कांता पांडे, वित्तीय सेवा सचिव विवेक जोशी, कॉर्पोरेट व्यवहार सचिव मनोज गोविल आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव, डीआयपीएम, सचिव डीएफएस इंडिया, सचिव, एमसीए२१ इंडिया आणि अर्थमंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत विविध केंद्रीय अर्थसंकल्पीय घोषणांच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेतला, असे अर्थ मंत्रालयाने ट्विट केले आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पातील विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्याबरोबरच, योजनांची कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रगतीचे सातत्यपूर्ण मूल्यांकन करण्याचे महत्त्व मंत्र्यांनी अधोरेखित केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in