ग्वाल्हेरमध्ये बिल्डरची कुटुंबासह आत्महत्या

एका व्यक्तीमुळे व्यथित झाल्यामुळे आपण टोकाचे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले आहे.
ग्वाल्हेरमध्ये बिल्डरची कुटुंबासह आत्महत्या

ग्वाल्हेर : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यात रविवारी बांधकाम व्यावसायिक, त्याची पत्नी आणि १७ वर्षांचा मुलगा त्यांच्या घरी फासावर लटकलेल्या अवस्थेत सापडले, अशी माहिती पोलिसांनी दिली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुलाने लिहिलेली एक सुसाइड नोट देखील सापडली आहे. ज्यामध्ये त्याने एका व्यक्तीमुळे व्यथित झाल्यामुळे आपण टोकाचे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले आहे. जितेंद्र झा (५०), त्यांची पत्नी त्रिवेणी झा (४०) आणि त्यांचा मुलगा अचल झा (१७) अशी या तिघांची नावे आहेत. हे तिघेजण सिरोल पोलीस ठाणे हद्दीतील हुरावली कॉलनीत राहत होते. ग्वाल्हेरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजेश सिंह चंदेल यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in