गुजरातमध्ये इमारत कोसळली ; अनेक जण अडकल्याची शक्यता

बचावकार्यासाठी एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल ; बचावकार्य युद्ध पातळीवर सुरु
गुजरातमध्ये इमारत कोसळली ; अनेक जण अडकल्याची शक्यता
Published on

गुजरातमध्ये सध्या पावसाने थैमान घातलं असून अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशात गुजरातच्या जुनागड येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे जुनागडमध्ये दोन मजली ईमारत कोसळळी असून या दुर्घटनेत १० ते १२ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती वर्तवण्यात येतेय. ही घटना घडल्यानंतर बचाव पथकाची एक टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहे. स्थानिकांच्या मदतीने आणि प्रशासनाच्या प्रयत्नातून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवण्याचे शर्थिचे प्रयत्न सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ही दुर्घटना आज(२४ जुलै) दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली असल्याची माहीती मिळाली आहे. कोसळलेली इमारत ही बाजार परिसरात होती. त्या परिसरात बाजार भरतो. त्यामुळे संबंधित परिसर हा प्रचंड वर्दळीचा आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर दुकानं आणि मागच्या बाजूला घरं होती. या इमरातीच्या ढिगाऱ्याखाळी अडकलेल्या नागरिकांमध्ये दुकानदार आणि ग्राहकांचा देखील समावेश असल्याचं सांगितलं जातंय.

बचावकार्यासाठी एनडीआरएफची टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे. जुनागडमद्ये पूर परिस्थिती असल्याने एनडीआरएफची पथकं आधिपासूनच दैनात आहेत. तसंच रुग्णवाहिका देखील घटनास्थळी दाखल झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in