ओदिशातही माफियांवर बुलडोझर फिरवणार; योगी आदित्यनाथ यांचा इशारा

बीजेडी सरकारला लांगूलचालन करणाऱ्या कंपूने घेरले आहे आणि जेव्हा ते सरकारला घेरतात तेव्हा हुकूमशाही निर्माण होते, त्यानंतर भ्रष्टाचार वाढतो...
(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)

भुवनेश्वर : ओदिशामध्ये डबल इंजिन सरकार स्थापन झाले तर सर्व प्रकारच्या माफियांवर बुलडोझर फिरवण्यात येईल, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी येथे सांगितले.

ओदिशामध्ये आम्हाला डबल इंडिनचे सरकार स्थापन करण्याची संधी द्या म्हणजे आम्ही उत्तर प्रदेशप्रमाणे येथे भूमाफिया, वाळूमाफिया, जंगलमाफिया आणि गुरेमाफिया यांच्यावर बुलडोझर फिरवून मार्ग मोकळा करू, असे आदित्यनाथ म्हणाले.

बीजेडी सरकारला लांगूलचालन करणाऱ्या कंपूने घेरले आहे आणि जेव्हा ते सरकारला घेरतात तेव्हा हुकूमशाही निर्माण होते, त्यानंतर भ्रष्टाचार वाढतो, गरीबांची पिळवणूक होते व प्रशासकीय यंत्रणा ढेपाळते, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in