गुजरातच्या भाविकांची बस उत्तराखंडमध्ये दरीत कोसळली; ५ ठार, १३ जण जखमी

भाविकांनी भरलेली बस कुंजापुरी मंदिराच्या दिशेने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती सुमारे ७० फूट खोल दरीत कोसळली.
(Photo - ANI)
(Photo - ANI)
Published on

टिहरी : टिहरी जिल्ह्यातील नरेंद्रनगर परिसरात सोमवारी कुंजापुरी-हिंडोलाखाल मार्गावर प्रवासी बस खोल दरीत कोसळून ५ भाविकांचा मृत्यू झाला, तर १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही बस गुजरातमधील भाविकांना घेऊन कुंजापुरी मंदिर दर्शनासाठी जात होती. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, भाविकांनी भरलेली बस कुंजापुरी मंदिराच्या दिशेने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती सुमारे ७० फूट खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच एसडीआरएफ व पोलीस-प्रशासनाची पथके घटनास्थळी दाखल झाली.

सुरुवातीला बसमध्ये २८ प्रवासी असल्याचे सांगितले जात होते, मात्र टिहरीच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये एकूण १८ प्रवासी होते. त्यापैकी ५ जणांचा मृत्यू झाला तर १३ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ‘एम्स’ ऋषिकेश येथे हलविण्यात आले आहे, तर उर्वरित दहा जणांवर नरेंद्रनगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

logo
marathi.freepressjournal.in