२०२७ पर्यंत भारतात ५ जीचे ५० कोटी ग्राहक होणार

एरिक्सनने मोबीलिटी रिपोर्टमध्ये भारतातील ५ जी सेवेचा विस्तृत आराखडा घेतला आहे.
२०२७ पर्यंत भारतात ५ जीचे ५० कोटी ग्राहक होणार

येत्या २०२७ पर्यंत भारतात ५ जीचे ५० कोटी ग्राहक असतील, असा अहवाल स्वीडीश दूरसंचार कंपनी ‘एरिक्सन’ने दिला आहे.

एरिक्सनने मोबीलिटी रिपोर्टमध्ये भारतातील ५ जी सेवेचा विस्तृत आराखडा घेतला आहे. भारतात दुसऱ्या सहामाहीत ५ जी सेवा व्यावसायिकरित्या सुरू होण्याची शक्यता आहे. २०२७ पर्यंत ५० कोटी लोकांकडे किंवा ३९ टक्के मोबाईलधारकांकडे ही ५ जी सेवा असेल. एरिक्सनचे एसईए, ओसिनिया आणि भारताचे नेटवर्क प्रमुख थ्वी सेंग नग म्हणाले की, २०२१ ते २०२७ दरम्यान भारतात मोबाईल डेटा ट्रॅफिक वाढणार आहे. भारतातील डेटा ट्रॅफिक जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. २०२१ मध्ये भारतात २० जीबी डेटा वापरला जात होता. तर २०२७ मध्ये हेच प्रमाण ५० जीबीपर्यंत जाणार आहे. जवळपास १६ टक्के डेटा ट्रॅफिकमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. भारतात ५ जी सेवा अजूनही सुरू झालेली नाही. परंतू २०२७ मध्ये एकूण दूरसंचार ग्राहकांच्या ४० टक्के ग्राहक हे ५ जीचे असतील. तर जागतिक स्तरावर २०२७ मध्ये ५ जीचे ४.४ अब्ज दूरसंचार ग्राहक असतील. येत्या पाच वर्षात उत्तर अमेरिका ‘५ जी’ सेवेत अग्रभागी असेल. तर १० पैकी ९ जणांकडे ‘५ जी’ असेल. एरिक्सनच्यावतीने ‘ओमडिया’ संशोधन कंपनीने अभ्यास केला. भारतात ५ जी सेवा सुरू झाल्यानंतर येत्या १२ वर्षात ५२ टक्के ग्राहक होतील. तर २०२४ पर्यंत भारतात ५ जी ग्राहकांची संख्या ३१ टक्क्यांपर्यंत वाढेल. ३२६ बिझनेस एक्झिक्युटिव्ह यांच्याकडून यांनी या सर्व्हेक्षणात सहभाग घेतला. कंटेट स्ट्रीमिंग, रिअल टाईम व्हीडिओ ॲनालिटिक्स, ड्रोन व वाहनांचे नियंत्रण ठेवणे आदी बाबी ५ जीमुळे शक्य होणार आहेत. एरिक्सन मोबिलिटी रिपोर्टनुसार, २०२२ च्या अखेरीपर्यंत जागतिक स्तरावर ५ जीचे १०० कोटी वापरकर्ते असतील. २०२७ पर्यंत ५ जीचे वापरकर्ते ८२ टक्के हे प. युरोप, ८० टक्के आखाती देश तर ७४ टक्के हे उत्तर-पूर्व आशियातील असतील. आतापर्यंतच्या सर्व मोबाईल तंत्रज्ञानात ५ जी हे सर्वात वेगवान तंत्रज्ञान असेल. सध्या जगात ७ कोटी ग्राहकांकडे ५ जी सेवा आहे.भारतातील दूरसंचार कंपन्या ५ जी सेवा सुरू करण्याची तयारी करत आहेत. ही सेवा विद्यमान ४ जी सेवेपेक्षा १० पट वेगवान असेल. भारतात सध्या ६८ टक्के जणांकडे ४ जी सेवा आहे. तर २०२७ मध्ये हेच प्रमाण ५५ टक्क्यांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने ५ जी सेवेच्या स्पेक्ट्रम लिलावाला मान्यता दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in