कोलकाता उच्च न्यायालयाने ईडी अधिकाऱ्यांना दिले संरक्षण

छाप्यात सहभागी असलेल्या ईडी अधिकाऱ्‍यांवर सोमवारपर्यंत कोणतीही जबरदस्तीची कारवाई करता येणार नाही.
कोलकाता उच्च न्यायालयाने ईडी अधिकाऱ्यांना दिले संरक्षण

कोलकाता : कोलकाता उच्च न्यायालयाने गुरुवारी संदेशखळी येथे टीएमसी नेते शाहजान शेख यांच्या मालमत्तेची झडती घेण्यासाठी गेलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांविरुद्धच्या एफआयआरच्या कारवाईवर अंतरिम स्थगितीचे आदेश दिले.

ईडीने उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील नाझत पोलीस ठाण्यात त्यांच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची विनंती करत कोर्टात धाव घेतली आणि दावा केला की त्यांच्यावर खोटे आरोप लावण्यात आले आहेत. एफआयआरमध्ये, दिदार बक्श मोल्ला याने ईडीच्या अधिकाऱ्यांवर ५ जानेवारी रोजी शेखच्या घरावर छापा टाकण्यासाठी चोरी, लोकांना मारहाण आणि महिलांचा विनयभंग केल्याचा आरोप केला होता. न्यायमूर्ती राजशेखर मंथा यांनी ३१ मार्चपर्यंत एफआयआरच्या संदर्भात कार्यवाहीवर अंतरिम स्थगितीचे आदेश दिले. आदल्या दिवशी न्यायमूर्ती जय सेनगुप्ता यांच्या दुसऱ्‍या एकल खंडपीठाने तोंडी निर्देश दिले की छाप्यात सहभागी असलेल्या ईडी अधिकाऱ्‍यांवर सोमवारपर्यंत कोणतीही जबरदस्तीची कारवाई करता येणार नाही.

logo
marathi.freepressjournal.in