ईडी हल्ल्याची ‘एसआयटी’ चौकशी होणार, कोलकाता उच्च न्यायालयाचे आदेश

बंगाल पोलीस ईडी हल्ल्याच्या तपासाला दिरंगाई करत असल्याचा आरोप ईडीने हायकोर्टात केला होता.
ईडी हल्ल्याची ‘एसआयटी’ चौकशी होणार, कोलकाता उच्च न्यायालयाचे आदेश

कोलकता: प. बंगालमध्ये ईडी अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याची चौकशी सीबीआय व पोलिसांच्या ‘एसआयटी’ने करावी, असे आदेश कोलकात्ता उच्च न्यायालयाने दिला.

उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, बंगाल पोलिसांनी ही एसआयटी लवकरात लवकर स्थापन करावी. बंगाल पोलीस ईडी हल्ल्याच्या तपासाला दिरंगाई करत असल्याचा आरोप ईडीने हायकोर्टात केला होता. त्यामुळे या हल्ल्याचा तपास राज्य पोलिसांकडून काढून घेऊन सीबीआयला सोपवला जावा. ‘ईडी’ने म्हटले आहे की, प. बंगालच्या पीडीएस घोटाळ्याप्रकरणी उत्तर २४ परगणा येथील टीएमसी संयोजक शाहजहा शेख यांच्या तीन ठिकाणची ईडी चौकशी करत होते. त्यावेळी ईडी टीम व सीआरपीएफच्या पथकावर ८०० ते एक हजार लोकांनी जीवघेणा हल्ला केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in