कॅनरा बँकेची २१२.३४ कोटींची फसवणूक; CBI चे छापे

केंद्रीय कॅनरा बँकेच्या २१२.३४ कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणुकीप्रकरणी अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुंबई, दिल्ली, नोएडा आणि इतर ठिकाणच्या 'आयएल अँड एफएस एनर्जी डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड'च्या व्यवस्थापकीय संचालक आणि संचालकांशी संबंधित विविध ठिकाणांवर छापे टाकले.
कॅनरा बँकेची २१२.३४ कोटींची फसवणूक; CBI चे छापे
कॅनरा बँकेची २१२.३४ कोटींची फसवणूक; CBI चे छापे
Published on: 

आशीष सिंह/मुंबई

केंद्रीय कॅनरा बँकेच्या २१२.३४ कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणुकीप्रकरणी अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुंबई, दिल्ली, नोएडा आणि इतर ठिकाणच्या 'आयएल अँड एफएस एनर्जी डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड'च्या व्यवस्थापकीय संचालक आणि संचालकांशी संबंधित विविध ठिकाणांवर छापे टाकले. या झडतीदरम्यान तपास यंत्रणेने बँक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे, म्युच्युअल फंड गुंतवणूक, संचालकांच्या मालकीच्या मालमत्ता आणि कंपनीचे आर्थिक रेकॉर्ड जप्त केले आहेत.

कॅनरा बँकेची २१२.३४ कोटींची फसवणूक; CBI चे छापे
Mumbai : अवैध मानवी स्त्रीबीज काढण्याच्या रॅकेटप्रकरणी ED ची कारवाई; २९ लाखांची रोकड जप्त

कॅनडा बँकेच्या वांद्रे (पूर्व), मुंबई येथील वर्तुळ कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या तक्रारीवरून २१ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. सीबीआयने या प्रकरणात कंपनी, तिचे व्यवस्थापकीय संचालक आणि संचालक सुनील वाधवा, अनूप सेठ, हरी शंकरन, रमेश चंद्र बावा आणि अरुण कुमार साह तसेच अज्ञात लोकसेवक आणि खासगी व्यक्तींना आरोपी म्हणून समावेश आहे. तक्रारीनुसार, कंपनीने तत्कालीन सिंडिकेट बँक मुंबई येथील मोठ्या कॉर्पोरेट शाखेमार्फत १०० कोटी रुपयांचे मुदत कर्ज घेतले होते.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in