राष्ट्रीय
राजस्थानात कार ट्रकवर आदळून पाच ठार
हे पाच जण आठवड्यापूर्वी सुट्टीसाठी काश्मीरला गेले होते. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नोखा रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आले आहेत.
जयपूर : बिकानेर जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे अमृतसर-जामनगर भारतमाला महामार्गावरील रासीसर गावाजवळ एक कार ट्रकला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात एका कुटुंबातील तिघांसह एकंदर पाच जणांचा मृत्यू झाला. सर्व गुजरातचे रहिवासी होते, अशी माहिती बिकानेरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ग्रामीण) प्यारेलाल शिवरन यांनी दिली.
पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला. यात डॉ. प्रतीक, त्यांची पत्नी हेतल आणि त्यांची दीड वर्षाची मुलगी, सार्वजनिक आरोग्य अधिकारी डॉ. पूजा आणि त्यांचे पती करण अशी या मृत व्यक्तींची नावे आहेत. हे पाच जण आठवड्यापूर्वी सुट्टीसाठी काश्मीरला गेले होते. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नोखा रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आले आहेत.