कार टी-सेल थेरपीमुळे ब्लड कॅन्सर उपचारांची नवी क्षितिजे खुली

भारतातील पहिल्या स्वदेशात विकसित करण्यात आलेल्या कार टी-सेल उत्पादनाला मार्केट ऑथोरायजेशन दिले आहे.
कार टी-सेल थेरपीमुळे ब्लड कॅन्सर उपचारांची नवी क्षितिजे खुली
PM

मुंबई: कार टी-सेल कायमेरिक अँटीजेन रिसेप्टर टी-सेल थेरपी इम्युनोथेरपीचा नवीन, आशादायक प्रकार आहे. ज्यामध्ये केमोथेरपी किंवा इतर उपचारांचा काहीही उपयोग होत नाही, अशा काही पुढच्या टप्प्यात पोहोचलेल्या ब्लड कॅन्सरमध्ये ही थेरपी उपयोगी ठरत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

आता ही थेरपी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मुंबईमध्ये उपलब्ध आहे. ही थेरपी प्रत्येक रुग्णानुसार विकसित केली जाते आणि कॅन्सरला टार्गेट करण्यासाठी रुग्णाच्या स्वतःच्या इम्यून सिस्टिम सेल्सना रिप्रोग्रामिंग करून काम करते. या इम्यून सेल्सना टी सेल्स किंवा टी लिम्फोसाईट्स म्हटले जाते, या पेशी संसर्गापासून आपले रक्षण करतात आणि कर्करोगाच्या पेशींना नष्ट करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

अगदी हल्लीपर्यंत ही थेरपी फक्त युनायटेड स्टेट्स, काही युरोपियन देश, इस्त्रायल व चीनमध्ये उपलब्ध होती. पण नुकतेच केंद्रीय औषधे नियंत्रण मानक संस्थेने (CDSCO) भारतातील पहिल्या स्वदेशात विकसित करण्यात आलेल्या कार टी-सेल उत्पादनाला मार्केट ऑथोरायजेशन दिले आहे.

भारतातील खर्च परदेशात येणाऱ्या खर्चाच्या फक्त एक-दशांश इतका आहे. हा अत्याधुनिक उपचार ब्लड कॅन्सरच्या रुग्णांसाठी विशेष तयार करण्यात आलेल्या कॅन्सर देखभालीमध्ये महत्त्वपूर्ण प्रगतीचे एक प्रतीक आहे. ही थेरपी एफेरेसिस प्रक्रियेमार्फत केली जाते, यामध्ये रुग्णाचे रक्त एका मशिनमार्फत वाहते, जे टी सेल्सना वेगळे करते. या टी सेल्सना कॅन्सरला मारणाऱ्या सुपरचार्ज्ड सेल्स बनवण्यासाठी कार जोडून प्रयोगशाळेमध्ये जेनेटिक मॉडिफिकेशन केले जाते. त्यानंतर त्यांची संख्या वाढू दिली जाते. पुरेशा पेशी तयार होईपर्यंत काही दिवसांसाठी रुग्णाला सुरुवातीचे उपचार दिले जातात. त्यानंतर पेशी पुन्हा रुग्णाच्या शरीरात सोडल्या जातात. हे उपचार केल्यावर काही प्रतिकूल परिणाम होऊ नयेत यासाठी रुग्णाची १० ते १२ दिवस देखभाल केली जाते. डॉ. समीर ए. तुळपुळे, सीनियर कन्सल्टन्ट - हेमेटो ऑन्कोलॉजी आणि बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशन, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल

logo
marathi.freepressjournal.in