कार्लसनने सहाव्या फेरीतनंतर घेतली आघाडी

कार्लसनने सहाव्या फेरीतनंतर घेतली आघाडी

भारतीय दिग्गज विश्वनाथन आनंदने नार्वे बुद्धिबळ टूर्नामेंटच्या ‘क्लासिकल’ गटात सहाव्या फेरीत नेदरलॅन्डच्या अनीश गिरीबरोबरची लढत बरोबरीत सोडविली. त्यामुळे आनंद ११.५ गुणांनी दुसऱ्या स्थानावर गेला. विश्व चॅम्पियन मॅग्नस कार्लसनने अझरबैजानच्या शखरियार मामेदयारोव याच्यावर विजय मिळवून सहाव्या फेरीतनंतर १२.५ गुणांसह आघाडी घेत सर्वोच्च स्थान पटकाविले.

काळ्या मोहऱ्यांनी खेळणारा आनंद आणि अनीश यांनी ३५ चालींनंतर सामना अनिर्णीत राखण्याबाबत सहमती दर्शविली. त्यानंतर आर्मगेडनमध्ये (सडन डेथ टाय ब्रेक) दोघांनी ४५ चाली खेळल्यानंतर लढत बरोबरीत राखणेच पसंत केले. आर्मगेडनच्या नियमांनुसार काळ्या मोहऱ्यांनी खेळणाऱ्या खेळाडूला सामना ड्रॉ राहिल्यानंतर विजेता समजले जाते.

गेल्या सामन्यात कार्लसनला नमविणाऱ्या ५२ वर्षीय आनंदचा आता तैमूर राद्जाबोव याच्याशी मुकाबला होईल.

कार्लसन आणि मामेदयारोव वगळता या फेरीतील अन्य सर्व लढती ड्रॉ राहिल्या. फ्रान्सच्या मॅक्सिम वाचिएर लाग्रेवने चीनच्या हाओ वांग याला, तर अमेरिकेच्या वेस्ली सो याने नॉर्वेजियन आर्यन तारीला सडन डेथ टाय ब्रेकमध्ये नमविले. वेसलिन टोपालोवने आर्मगेडनमध्येही राद्जाबोवबरोबरची लढत ड्रॉ ठेवली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in