राजस्थानमध्ये जाती जनगणना होणार

ओबीसींना २१ वरून २७ टक्के आरक्षण, मूळ ओबीसींना विशेष ६ टक्के आरक्षण
राजस्थानमध्ये जाती जनगणना होणार

जयपूर : राजस्थानात जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज केली. ओबीसी आरक्षण २१ वरून २७ टक्के केले आहे. तर मूळ ओबीसींसाठी ६ टक्के विशेष आरक्षण दिले जाईल.

बांसवाडा येथे विश्व आदिवासी दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

राजस्थानमध्ये आरक्षण आता ७० टक्के झाले आहे. अनुसूचित जाती- १६ टक्के, अनुसूचित जमाती १२ टक्के, ओबीसी २१ टक्के, आर्थिक मागास १० टक्के, एमबीसी ५ टक्के, ओबीसींचे आरक्षण वाढवून २७ टक्के केल्याने राजस्थानमध्ये ७० टक्के आरक्षण होईल.

logo
marathi.freepressjournal.in