जातनिहाय जनगणना आंध्र प्रदेशात सुरू

राज्यभरातील ग्रामीण सचिवालय व्यवस्था या माहितीतील सत्यता पडताळून पाहील व खात्री झाल्यानंतरच माहितीची नोंद केली जाईल.
जातनिहाय जनगणना आंध्र प्रदेशात सुरू

अमरावती : आंध्र प्रदेश सरकारने शुक्रवारपासून संपूर्ण राज्यात व्यापक जातनिहाय जनगणनेची सुरुवात केली. राज्यातील सर्व जाती समुदायांचा या जनगणनेत समावेश करण्यात आला आहे. माहिती व जनसंपर्क मंत्री सी. श्रीनिवास वेणुगोपाल कृष्णा यांनी १९ जानेवारीपासून दहा दिवस ही जनगणना चालेल, असे सांगितले आहे. बिहारनंतर जातनिहाय जनगणना करणारे आंध्र प्रदेश हे देशातील दुसरे राज्य ठरले आहे. एकाच टप्प्यात व्यापक जनगणना हाती घेण्यात आली असून ती दहा दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे. आंध्र प्रदेशचे माहिती व जनसंपर्क मंत्री सी. श्रीनिवास वेणुगोपाल कृष्णा यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, जातनिहाय जनगणना १९ जानेवारी रोजी सुरू झाली असून ती १० दिवस चालेल. गरज पडल्यास चार ते पाच दिवस वाढवून दिले जातील. जनगणना करणारे स्वयंसेवक प्रत्येक घराला भेट देतील. तेथे जातनिहाय सर्व माहिती जमा करतील. ही माहिती ग्रामीण सचिवालय व्यवस्थेला पाठवण्यात येईल. कृष्णा पुढे म्हणाले की, राज्यभरातील ग्रामीण सचिवालय व्यवस्था या माहितीतील सत्यता पडताळून पाहील व खात्री झाल्यानंतरच माहितीची नोंद केली जाईल. प्रत्येक स्वयंसेवक ५० घरांची माहिती जमा करेल. देशात लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधी १५ फेब्रुवारीच्या आत ही जनगणना प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असा विश्वास कृष्णा यांनी व्यक्त केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in