सत्यपाल मलिक यांच्यामागे सीबीआयचा ससेमिरा ; विमा घोटाळाप्रकरणी पाठवली नोटीस

जम्मू-काश्मीरच्या प्रशासनाने केंद्र सरकारकडे नुकतीच केली होती. ही मागणी केंद्र सरकारने आता मंजूर केली
सत्यपाल मलिक यांच्यामागे सीबीआयचा ससेमिरा ; विमा घोटाळाप्रकरणी पाठवली नोटीस

सीबीआयने जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना विमा घोटाळाप्रकरणी नोटीस पाठवली आहे. मलिक यांना २७ व २८ एप्रिलला अकबर रोड गेस्टहाऊस येथे हजर राहण्याचे समन्स सीबीआयने बजावले आहे.

जम्मू-काश्मीरमधील दोन प्रकल्पात झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला असून याच प्रकरणात मलिक यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. या दोन प्रकल्पांच्या फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी आपल्याला ३०० कोटी रुपयांची लाच देऊ करण्यात आली होती, असा गौप्यस्फोट मलिक यांनी केला होता.

ही लाच अंबानी व आरएसएसशी संबंधित व्यक्तींच्या दोन फाईलच्या मंजुरीसाठी देऊ करण्यात आली होती, असा दावाही सत्यपाल मलिक यांनी केला होता. मात्र, आपण हा व्यवहार रद्द केला. मलिक यांच्या या दाव्याबद्दल सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी शिफारस जम्मू-काश्मीरच्या प्रशासनाने केंद्र सरकारकडे नुकतीच केली होती. ही मागणी केंद्र सरकारने आता मंजूर केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in