नीरा राडियाला सीबीआयकडून क्लीन चिट

सीबीआयने सांगितले की, कारवाई योग्य बाब न मिळाल्यामुळे प्राथमिक चौकशी बंद करण्यात आली आहे
नीरा राडियाला सीबीआयकडून क्लीन चिट

टॅपिंग प्रकरणात कॉर्पोरेट लॉबीस्ट नीरा राडियाला सीबीआयने क्लीन चिट दिली आहे. माजी कॉर्पोरेट लॉबीलिस्ट नीरा राडिया यांच्या विरोधात राजकारणी, वकील, पत्रकार आणि उद्योगपती यांच्यातील संभाषणाच्या टेपच्या सामग्रीचे परीक्षण करताना त्यांना काहीही आक्षेपार्ह आढळले नाही, अशी माहिती सीबीआयच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. सीबीआयने सांगितले की, कारवाई योग्य बाब न मिळाल्यामुळे प्राथमिक चौकशी बंद करण्यात आली आहे.

सीबीआयच्या वकिलांनी कॉर्पोरेट लॉबीस्ट नीरा राडियाला ८ हजार वेगळ्या टॅप केलेल्या संभाषणांशी संबंधित प्रकरणात क्लीनचीट दिली आहे. तसेच सीबीआयने म्हटले आहे की त्यांनी या संबंधित १४ प्रकरणांमध्ये प्राथमिक चौकशी केली होती. परंतु एकही गुन्हा दाखल करण्यासारखे आढळले नसल्याने प्राथमिक चौकशी करुन प्रकरण बंद करण्यात आले.

न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ नीरा राडिया विरुद्ध रतन टाटा प्रकरणावर सुनावणी करत आहे. या याचिकेत, ८४ वर्षीय उद्योगपतीने लॉबिस्ट नीरा राडिया आणि टाटा समूहाचे बॉस यांच्यातील दूरध्वनी संभाषण प्रसारित केल्यानंतर प्रसारमाध्यमांनी त्यांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in